नाशिक: राज्यातील नवउद्यमांना मूर्त स्वरुप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नावीन्यता यात्रेतंर्गत जिल्हास्तरीय सादरीकरणात तीन नवउद्यम संकल्पनांचा गौरव करण्यात आला. नाशिकमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय सादरीकरण सत्रात एकूण ७८ जणांनी आपल्या नवसंकल्पनांची मांडणी केली. परीक्षकांनी दिलेल्या गुणांच्या आधारे तीन संकल्पनांचा गौरव झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात नवसंकल्पनांचे सादरीकरण झाले.

हेही वाचा >>> जळगाव: गाळेभाडे थकबाकीवरील दंड २५ ऐवजी दोन टक्के आकारणार; गाळेधारक संघटना शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

हेही वाचा >>> नाशिक: जिल्ह्यातून सहाशेहून अधिक बससेवेचे नियोजन

प्रथम आलेल्या शुभम मोडके आणि गटास २५ हजार रुपयांचा धनादेश आणि प्रमाणपत्र, द्वितीय आलेल्या शुभम गुजर यांना १५ हजाराचा धनादेश आणि प्रमाणपत्र तसेच तृतीय आलेल्या अमर रंधे यांना १० हजाराचा धनादेश आणि प्रमाणपत्र प्रदान करुन जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी प्रथम आलेल्या शुभम मोडके आणि गटाने शेतक-यांना औषध फवारणी करताना येणा-या अडचणींवर उपाय म्हणुन तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार केलेल्या त्यांच्या ॲग्रीकल्चर ड्रोन ॲण्ड अवेअरनेस या संकल्पनेविषयी, द्वितीय आलेल्या शुभम गुजर यांनी वीजचोरी आणि विजेचा अपव्यय टाळण्यासाठी उपाय म्हणून तयार केलेल्या संकल्पनेविषयी आणि तृतीय आलेल्या अमर रंधे यांनी पर्यटन यात्रा करताना येणा-या विविध अडचणींवर उपाय म्हणुन तयार केलेल्या संकल्पनांचे जिल्हाधिका-यांसमोर सादरीकरण केले.

Story img Loader