नीलेश पवार
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील राजनी फाट्याजवळ सोमवारी बस उलटून तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटून ती लगतच्या चारीत उलटी झाल्याचे सांगण्यात येते. या अपघातात बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही बस तळोद्याहून धनपूरकडे जात होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बसमध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात असल्याने अपघातात शालेय विद्यार्थीदेखील जखमी झाले आहेत. अपघातात जीवितहानी झालेली नाही. दोन ते तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर किरकोळ जखमींना प्रतापपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात  दाखल करण्यात आले. यावेळी जखमींच्या नातेवाईकांनी आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three passengers seriously injured after bus overturns in nandurbar district nashik news amy