नाशिक – सिन्नर तालुक्यातील नायगाव शिवारात बिबट्याने दुचाकीस्वारांवर केलेल्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात बिबट्याचा संचार शेतकऱ्यांसह रस्त्याने जाऱ्ये करणाऱ्यांसाठी धोकादायक ठरु लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अपहार प्रकरणी धुळे जिल्ह्यात सरपंच, ग्रामविकास अधिकारी निलंबित

बुधवारी रात्री नायगाव शिवारातील वडझिरे रस्त्यालगत असलेल्या भीमाशंकर नर्सरीजवळ बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला. अजय सिंह यांच्यासह त्यांचा मुलगा लखन आणि चेतन हे शेतातील कामे झाल्यानंतर दुचाकीने नायगावला येत असताना गवतात लपून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही जखमी झाले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या पळाला. वन विभागाच्या वतीने परिसरात बिबट्या जेरबंद होण्यासाठी पिंजरे लावण्यात आले असले तरी नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे. नायगावसह जळगाव, जोंगलेटेंभी, सोनगिरी, वडझिरे, देशवंडी, ब्राह्मणवाडी या भागात दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे.