नाशिकमधील कुंभमेळ्यातील शाहीस्नानाच्या दुसऱया पर्वणीला रविवारी एका अपघातामुळे गालबोट लागले. नाशिक पेठ रस्त्यावर रविवारी दुपारी कार आणि टेम्पोच्या धडकेत तीन भाविकांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. हे सर्वजण सिल्व्हासामधील राहणारे आहेत.
कुंभमेळ्यातील दुसऱया शाहीस्नानासाठी हे भाविक नाशिकला आले होते. स्नान आटोपल्यावर नाशिक पेठ रस्त्यावरून जात असताना समोरून आलेल्या एका दुचाकीला होणारी धडक टाळण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीची टेम्पोला धडक झाली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले. गोविंदराम पारीख (३०), विकी पारीख (१०), श्रावणकुमार (३२) अशी मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची नावे आहेत. रामदेवहरी पारीख, मंजूदेवी पारीख, रविंद्र हे तिघेजण जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चौकशी करीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा