बोलेरो गाडीच्या प्रवासी भाडय़ापोटी दरमहा तीस हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून तिघा संशयितांनी लहवित येथील एकाची महिंद्रा बोलेरो कार पळविली. संपत निर्मळे यांनी काही महिन्यांपूर्वी गाडी खरेदी केली होती. पाथर्डी फाटा येथील दीपक साळुंखे, इंडिरानगर येथील दत्ता कडवे आणि इगतपुरीच्या राजेश भोसले यांनी संगनमत करून निर्मळे यांची फसवणूक करण्यासाठी सापळा रचल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही कार ओझर येथे भाडय़ाने चालविण्यात देतो, त्यासाठी दरमहा तीस हजार रुपये मिळतील असे संशयितांनी सांगितले. पाथर्डी फाटा येथील हॉटेल एक्सप्रेस इन येथे निर्मळे यांना बोलावून घेत त्यांच्याकडील गाडी ताब्यात घेतली. या संशयितांनी अद्याप कोणत्याही प्रकारे भाडे दिले नसून गाडी परत न करता तिचा अपहार केल्याची तक्रार निर्मळे यांनी दिली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा