लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: दरेगांव शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन संशयितांना अटक करण्यात आली असून अन्य चार संशयित फरार आहेत. संशयितांकडून पोलिसांनी ५१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरेगाव शिवारात मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या हॉटेलमागे एका वाहनात काही संशयित दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. कुरेशी अक्रम (२५), शेख मजहर (२९), जाहिद अहमद (३२), वकार अली अमजद अली उर्फ वकार मास्टर, शेख जाहिद उर्फ जाहीद बाबा, माजिद अन्सारी, मोहंमद अमिन उर्फ अमिन गोल्डन (सर्व रा. मालेगाव) हे दरोडा टाकण्याच्या तयारीत होते.

हेही वाचा… आस्था संस्थेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

पोलिसांनी २५ हजार रुपयांची गावठी बंदूक, धारदार शस्त्र असा ५१, ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिसांनी कुरेशी, शेख मजहर, जाहिद अहमद यांना ताब्यात घेतले असून अन्य चार संशयित फरार आहेत.