लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाशिक: विहिरीच्या खोदकामासाठी केलेल्या सुरुंग स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी येथे घडली. मृत झालेले कामगार हे बीडच्या आष्टी तालुक्यातील आहेत.
मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता हिरडी येथे ही दुर्घटना घडली. वाघेरा घाटावरील भागात हा पाडा आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून विहिरीचे काम सुरू होते. खोदकामात सुरुंगाचा बार उडवला जातो. त्याच स्फोटात सापडून तीन कामगारांच्या हातापायासह डोक्याला गंभीर दुखापत झाली. ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील कामगारांना रोहिले आरोग्य केंद्रामार्फत रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. तथापि, तत्पुर्वीच या कामगारांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
मयत कामगारांमध्ये लहू महाजन (३९, वंजारवाडी, आष्टी, बीड), आबा उर्फ पिनू बोराडे (३६, आष्टी बीड) आणि विभिषण जगताप (४०, धिरडी, आष्टी, बीड) यांचा समावेश आहे. या बाबतची माहिती हरसूल पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दिलीप बोडके यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हिरडी येथे धाव घेतली. ही दुर्घटना कशी घडली, स्फोटात कामगार कसे सापडले याचा तपास सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.