शहरातील गुजराल पेट्रोलपंपाजवळील उड्डाणपुलावरील दुभाजकावर भरधाव दुचाकी धडकल्याने दोन तरुण मित्रांचा मोटारीखाली सापडल्याने मृ़त्यू झाला. दुसऱ्या अपघातात अजिंठा चौफुलीवर मालमोटारीखाली सापडल्याने तरुणाचा म़ृत्यू झाला. याप्रकरणी तालुका व एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा- जळगावातून फेब्रुवारीपासून विमानसेवा सुरु होणार

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
stray puppies burnt alive
तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या ५ पिलांवर पेट्रोल टाकून जाळलं; झोप मोड होते म्हणून २ महिलांचं क्रूर कृत्य
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास

शहरातील गुजराल पेट्रोलपंपाजवळील उड्डाणपुलावरील दुभाजकावर भरधाव दुचाकी आदळून मयूर लंके-साळुंखे (१९, रा. पथराड, ता. धरणगाव), दीपक पाटील (२१, रा. बोरखेडा, ता. धरणगाव) हे दोघे मित्र मोटारीखाली सापडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर अजिंठा चौफुलीवर भरधाव मालमोटारीने नगीन राठोड (३८, रा. एमआयडीसी) याला चिरडले. शहरातील एमआयडीसी भागातील रहिवासी नगीन राठोड आणि उदय राठोड हे कामानिमित्त सुनसगाव येथे गेले होते. काम आटोपून जळगावात आल्यानंतर शनिवारी रात्री आठच्या सुमारास अजिंठा चौफुलीवर थांबलेले असताना आकाशवाणीकडून भुसावळकडे जाणार्‍या मालमोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात नगीनचा म़त्यू झाला, तर उदय राठोड गंभीर जखमी झाला.