जळगाव : भरधाव बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी हा अपघात झाला. याबाबत वरणगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – नाशिक सहकारी साखर कारखान्याजवळ बिबट्या जाळ्यात

हेही वाचा – जळगाव : तहसीलदार, नायब तहसीलदार वेतनवाढीसाठी सामूहिक रजेवर; तहसील कार्यालयांत कामकाज ठप्प

पोलीस सूत्रांनी सांगितले की, भुसावळ येथील आगाराच्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीवरील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. सचिन शेळके, भागवत शेळके व जितेंद्र चावरे यांचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव फाट्यानजीक नागेश्‍वर मंदिर यादरम्यान घडली. हे तिन्ही युवक बोदवड तालुक्यातील मनूर गावातील आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रभारी पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, हवालदार पराग दुसाने यांच्यासह कर्मचार्‍यांनी पंचनामा केला. युवकांचे मृतदेह वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. याप्रकरणी वरणगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, हवालदार पराग दुसाने तपास करीत आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three youths died on the spot in a bus and two wheeler accident in jalgaon ssb