लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाशिक: महाराष्ट्राची सहकार परंपरा विकासात्मक असून तळागाळातील जनतेला आर्थिक सबलीकरणाचा तो मूलभूत आधार आहे. त्यासाठी आजच्या आधुनिक युगात प्रबोधनात्मक जाणीव गतिमान करण्यासाठी नाशिक येथे डिसेंबरमध्ये होणारी राज्यस्तरीय सहकार परिषद ही आर्थिक विकासाचे प्रारुप म्हणून सर्वांसमोर येईल, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे डिसेंबरमध्ये येथे होणाऱ्या सहकार परिषदेच्या बोधचिन्हाचे अनावरण डॉ. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. गंगापूर रस्त्यावरील कर्मवीर बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. पवार यांनी सहकार क्षेत्रातील प्रश्न आणि अडचणी सोडविण्यासाठी तज्ज्ञांच्या सहभागातून होणाऱ्या परिषदेमार्फत निश्चित दिशा मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. केंद्र सरकारचे सहकार मंत्रालय यासाठी मदत करेल. त्यासाठी मी पुढाकार घेईन. परिषदेच्या माध्यमातून सहकार बँकिंग क्षेत्रातील आधुनिक बदल, डिजिटलायझेशन, तंत्रज्ञान, भविष्यातील आव्हाने आदी्ंवर विचारमंथन होईल. ते भारताच्या अर्थ व्यवस्थेला पुढे नेणारे ठरेल. त्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने सहकार परिषद यशस्वी करू, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा… रस्ते खोदून ठेवल्याने जळगावकरांच्या गैरसोयींमध्ये भर

बँक्स् असोसिएशनचे अध्यक्ष व सहकार परिषदेचे निमंत्रक विश्वास ठाकूर यांनी परिषदेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाकडे नागरी सहकारी बँकांच्या संबंधातील असलेले प्रश्न, समस्या व अडचणींचे निराकरण व्हावे, ही अपेक्षा असल्याचे नमूद केले. सहकार परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, डॉ. भागवत कराड, आरबीआयचे संचालक सतीश मराठे आदींना तर समारोप समारंभाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींना निमंत्रित केले जाणार आहे. सहकार भारतीच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे यांनी सहकारात सकारात्मक प्रवृती निर्माण व्हावी, सहकारी बँकांमधील सुसंवाद वाढावा, त्यातून विकासात्मक प्रश्नांना गती मिळावी तसेच सहकाराच्या नव्या बदलाविषयी साधकबाधक चर्चा व्हावी, हा सहकार परिषदेचा उद्देश असल्याचे सांगितले.