लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मनमाड: भुसावळ रेल्वे विभागात गुरुवारी एकाच दिवशी तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान विना तिकीट, अनधिकृत प्रवासाच्या ५,९५२ प्रकरणांतून रुपये ५०.८४ लाख दंड वसूल करण्यात आला.

आणखी वाचा-धुळे जिल्ह्यातील युवावर्गास स्पर्धा परीक्षेचे मोफत धडे, पालकमंत्री गिरीश महाजन यांची संकल्पना

रेल्वे प्रबंधक इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धिरेंद्र सिंह आणि सहायक वाणिज्य मंडळ प्रबंधक (तिकीट तपासणी) रत्नाकर क्षीरसागर यांच्या नेतृत्वात भुसावळ विभागाच्या एकूण ५३७ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी विभागात अचानक तिकीट तपासणी मोहीम राबवली. सर्व अधिकृत तिकीटधारक रेल्वे वापरकर्त्यांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी भुसावळ विभागातर्फे विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा, विशेष गाड्यांमध्ये अशी अचानक तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येते. गैरसोय टाळण्यासाठी व सन्मानाने प्रवास करण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन भुसावळ विभागाने रेल्वे प्रवाशांना केले आहे.