लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांचा गट सामील झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार, याबद्दल चर्चा होत असली तरी पालकमंत्री कोण असणार हे निश्चित करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचे विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. या संदर्भात त्यांच्याकडून जो निर्णय घेतला जाईल त्याची अमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

भुसे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पालकमंत्रिपदाबाबत भूमिका मांडली. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतर नाशिकचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ अथवा भाजपचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यापैकी एकाकडे जाणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर भुसे यांनी त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे स्पष्ट केले. नागपूर येथे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टिकेवर भुसे यांनी नाराजी व्यक्त केली.

आणखी वाचा-नाशिक: बागलाणमधील टंचाईग्रस्त गावांसाठी टँकरची व्यवस्था

ठाकरे यांनी खालच्या पातळीवर जाऊन बोलणे योग्य नाही. महाराष्ट्राची ही संस्कृती नसून नागरिकांना ती आवडली नसल्याचे ते म्हणाले. आढावा बैठकीला अनेक आमदार उपस्थित नव्हते. काही आमदार कामामुळे उपस्थित राहू शकले नसतील. शासन आपल्या दारी हा आपल्या सर्वांचा कार्यक्रम असून तो यशस्वी करणे आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे भुसे यांनी नमूद केले. रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या प्रश्नावर त्यांनी विस्तार झाला नसला तरी त्यामुळे कामे थांबलेली नसल्याचा दावा केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To appoint the guardian minister is the right of the chief minister says dada bhuse mrj
Show comments