नाशिक : शहराचा रखडलेला विकास, स्मार्ट सिटी योजनेच्या कामांचा केवळ गवगवा, याकडे लक्ष वेधण्यासाठी शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने शहरात चार फूट दुर्बिणींने चला शोधूया स्मार्ट नाशिक हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या कारभारामुळे नाशिककर हैराण झाले आहेत. एकिकडे स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठा गाजावाजा करत करोडो रुपये खर्च केले जात असताना नाशिककरांना मात्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीला नाशिककरांशी कुठलेही देणेघेणे नसून केवळ मनमानी कारभार करण्यात येत असल्याचा आरोप करुन निषेधार्थ चार फूट दुर्बिणीतून चला शोधूया स्मार्ट नाशिक हे आंदोलन शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने पंचवटीतील निमाणी बस स्थानक येथे करण्यात आले.

Devendra Fadnavis claims that Ladaki Bahin Yojana will benefit everyone without discrimination
धर्मभेद न करता लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
loksatta kutuhal artificial intelligence for good governance
कुतूहल : उत्तम प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !

हे ही वाचा…गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद

नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. स्मार्ट सिटीच्या कामांमुळे शहरात काही ठिकाणी जो बकालपणा आला, त्यास जबाबदार कोण, एकीकडे स्वच्छतेच्या नावावर करोडो रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिक शहर २३ व्या स्थानावर का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या नावाखाली करोडो रुपयांचे यांत्रिक झाडू महानगरपालिकेने घेतले. ते धूळखात पडून असल्याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले.

हे ही वाचा…पाणी वितरणातील गोंधळ दूर करा, मग सल्ले द्या…; नाशिक महापालिकेच्या दाव्यावर भाजप आमदारांचे टिकास्त्र

आंदोलनाचे नेतृत्व नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी केले. यावेळी छाजेड यांनी, महापालिकेचा भोंगळ कारभार आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार यामुळे नाशिकचा विकास थांबला असल्याची टीका केली. शहराचे रस्ते उघडले गेले असतानाही महानगर प्रशासनाला जाग नाही. यापुढे काँग्रेसचे कार्यकर्ते प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा छाजेड यांनी दिला. डॉ. ठाकूर यांनी, आंदोलनात प्रतिकात्मक दुर्बिण असली तरी नागरिकांनी आता प्रशासनाला प्रश्न विचारला पाहिजे, असे सांगितले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे, प्रदेश काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील, माजी नगरसेवक राहुल दिवे आदी यावेळी उपस्थित होते.