नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांच्या वतीने परिमंडळ दोनमध्ये गुन्हेगार तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एक गावठी बंदूक, ह्त्यारासह दोन तडीपारांना ताब्यात घेण्यात आले.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनानुसार आगामी निवडणुका लक्षात घेता गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. याअंतर्गत परिमंडळ दोनमध्ये उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी रात्री तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नोंदीतील २०६ गुन्हेगार तपासून मिळून आलेल्या गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार इंद्रजीत वाघ याच्याकडे गावठी बंदूक सापडले.
हेही वाचा…महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या
त्याच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मोरे मळा, पवारवाडी येथे सुनील जाधव याच्याकडे विनापरवाना १५ देशी दारूच्या बाटल्या आढळल्या. रुपये १०५० चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. नाशिकरोड येथे राम पवार (रा. सिन्नरफाटा) याच्याकडे घातक हत्यार आढळले. त्याच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तडीपार गुन्हेगारांची तपासणी केली असता उपनगर आणि नाशिकरोड परिसरात नितीन बनकर (रा. रोकडोबावाडी) आणि उमेश गायधनी (रा. पळसे) हे निर्बंधित क्षेत्रात आढळले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मोटार वाहन कायद्यानव्ये ११३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.