नाशिक – सर्वकाही नाशिककर असे स्वरुप असलेल्या ‘तो राजहंस एक’ या सोशल नेटवर्किंग फोरम आणि सपान, नाशिक यांची निर्मिती असलेल्या नाटकाला नवी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातर्फे आयोजित २३ व्या भारतीय रंग महोत्सवासाठी अर्थात ‘भारंगम’ या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.

‘तो राजहंस एक’ चे लेखन दत्ता पाटील यांनी केले असून दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले आहे. पाटील-शिंदे जोडगोळी नाशिकचीच आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा यांच्या वतीने आयोजित भारंगम महोत्सव एक ते २१ फेब्रुवारी या कालावधीत नवी दिल्ली आणि भारतातील विविध महत्वाच्या शहरांमध्ये होणार आहे. भारंगम महोत्सवासाठी निवड समिती त्यांच्याकडे आलेल्या प्रवेशिकांमधून नाटकांची निवड करते. परंतु ‘तो राजहंस एक’ या नाटकाला भारंगमच्या विशेष सल्लागार समितीने थेट महोत्सवात सादर करण्याचे निमंत्रण दिले आहे. हे नाटक भारंगम महोत्सवात नवी दिल्ली येथे १४ फेब्रुवारी रोजी सादर होईल.

Winter Special Kabab Recipe In Marathi
हिवाळा स्पेशल कबाब; चव अशी की एकदा खाल तर खातच रहाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Lakhat Ek Aamcha Dada fame nitish Chavan wishing post for Mahesh Jadhav
Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
Muramba
फिल्मी स्टाइलने अक्षयने रमाला केले प्रपोज; गोड नात्याची नव्याने होणार सुरुवात, ‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट
singles day in china
11/11: याच दिवशी का साजरा केला जातो ‘सिंगल्स डे’?
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा

हेही वाचा – मालेगाव : पाणीपट्टी दरवाढी विरोधात मालेगावकर आक्रमक, लोटांगण आंदोलन

नाशिकमधील पाटील-शिंदे व्दयींच्या ‘हंडाभर चांदण्या’ या प्रायोगिक नाटकाला आणि नाशिकचे प्राजक्त देशमुख लिखित संगीत देवबाभळी या व्यावसायिक नाटकालाही यापूर्वी हा बहुमान प्राप्त झाला आहे. लेखक दत्ता पाटील आणि दिग्दर्शक सचिन शिंदे यांची अनेक प्रायोगिक नाटके मराठी रंगभूमीवर या आधीही गाजली आहेत. सामाजिक, राजकीय, धार्मिक, जातीय, आर्थिक समतोल राखण्याच्या अपयशातून एका पस्तीशीतली स्वत्व हरवलेल्या संवेदनशील शेतकरी तरुणाची कथा “तो राजहंस एक” या नाटकातून मांडली आहे. नाटकात ‘देवबाभळी’कार प्राजक्त देशमुख आणि अभिनेत्री अनिता दाते यांच्या समवेत अमेय बर्वे, धनंजय गोसावी, हेमंत महाजन, राजेंद्र उगले, प्रणव प्रभाकर यांच्या भूमिका आहेत. सोशल नेटवर्किंग फोरमचे प्रमोद गायकवाड निर्माते आहेत.

नाटकातील संदेशाला राष्ट्रीय व्यासपीठ – अनिता दाते

मुळात ‘तो राजहंस एक’ या नाटकात आपले वास्तव जगणे आणि त्यातील विभ्रम याच्या सीमारेषेवरील एक विलक्षण गोष्ट आपल्याला अनुभवायला मिळते. मनाच्या आजारपणातून विराट होत जाणाऱ्या प्रश्नांना हे नाटक भिडते. त्यासोबतच संदेशही देते. अतिशय सशक्त अशा या नाटकात सशक्त अशा सहकाऱ्यांसोबत अभिनय करणे हा विलक्षण अनुभव आहे. भारंगम महोत्सवातील निवडीमुळे या नाटकाचा आशय आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचेल, याचा जास्त आनंद झाला. – अनिता दाते (कलाकार)

हेही वाचा – जळगाव जिल्ह्यात कर्जामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

प्रायोगिक रंगभूमीचा सन्मान

एक अभिनेता म्हणून मला दत्ताची नाटके नेहमीच आव्हानात्मक वाटतात. त्यामुळे मी त्याच्या नाटकात काम करायला उत्सुक असतो. नवी दिल्लीच्या भारंगम महोत्सवात तो राजहंस एकची निवड होणे, हे प्रत्येक नाट्यकर्मीचे स्वप्न असते. नाटकाला विशेष सन्मानाने निमंत्रित करणे ही त्याहून अधिक महत्वाची गोष्ट या नाटकाच्या बाबतीत घडल्याने खूप आनंद होत आहे. हा एक प्रकारे आम्ही सातत्याने प्रयोगिक रंगभूमीवर करीत असलेल्या प्रयत्नांचाच सन्मान आहे. – प्राजक्त देशमुख (कलाकार)

प्रयत्नांना बळ देणारी घटना – सचिन शिंदे

नाशिकच्या प्रायोगिक रंगभूमीवर गेली काही वर्षे आम्ही मराठी रंगभूमीला काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करत आहोत. हंडाभर चांदण्यानंतर आता तो राजहंस एक हे नाटकही भारंगम महोत्सवात निमंत्रित झाल्याने आमच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना एक प्रकारे शाबासकीच मिळाली आहे. ही घटना खूप बळ देणारी आहे. नाटक घडत राहो. – सचिन शिंदे (दिग्दर्शक)