लोकसत्ता वार्ताहर

नंदुरबार: मार्च महिन्यात जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाने पाच हजार ५६७४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सहा आणि १७ मार्च रोजी झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याचे चित्र आहे.

Villagers of Kundevhal Bambawipada suffer from respiratory problems due to dust from mines
कुंडेवहाळ, बंबावीपाडा ग्रामस्थांचे आयुष्य ‘माती’मोल; खदाणींच्या धुळीमुळे श्वसनाचे विकार, प्रशासनाचे दुर्लक्ष
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
266 people died in road accidents in Raigad in year
रायगडमध्ये वर्षभरात रस्ते अपघातात २६६ जणांचा मृत्यू
126 killed in earthquake in Tibet news
तिबेटमध्ये भूकंप, १२६ ठार,रिश्टर स्केलवर ६.८ तीव्रता; १८८ जण जखमी
state bank of india poverty rate
देशात अतिदारिद्र्याचे नाममात्र अस्तित्व, स्टेट बँक संशोधन टिपणाचा दावा
Rural Poverty SBI report
Rural Poverty : गाव आणि शहरातील अंतर घटलं; १२ वर्षांमध्ये ग्रामीण दारिद्र्य २५ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर
Maharashtra accident 11 deaths
तीन दुर्घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू, सोलापूर, जालन्यात मोटारींचे अपघात; चंद्रपुरात दुचाकीची ट्रकला धडक
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मार्च महिन्यात सातत्याने जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला आहे. सहा मार्च रोजी झालेल्या गारपिटीसह अवकाळीने जिल्ह्यातील ४४७२ शेतकऱ्यांचे २०३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यानंतर १५ मार्च रोजी झालेल्या गारपिटीत ३५ शेतकऱ्यांचे ११.२५ हेक्टरवरील पिकाचे, १७ मार्च रोजी झालेल्या गारपिटीत २८ शेतकऱ्यांचे १३६.८ हेक्टरवरील पिकांचे तर, १९ मार्च रोजी झालेल्या गारपिटीत ६६६४ शेतकऱ्यांचे ३४८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे उघड झाले आहे. यातील पहिल्या दोन नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन भरपाईसाठी शासन दरबारी मागणी देखील करण्यात आली असून नंतरच्या दोन नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसात पूर्णत्वास येतील, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

आणखी वाचा- नाशिक : तृणधान्य महोत्सवास जिल्हा परिषदेकडून अखेर मुहूर्त

जिल्ह्यातील कांदा, ज्वारी, गहू, मका , हरभरा, भाजीपाला, आंबा, टरबूज, केळी, पपई यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास ११ हजार ५४४ शेतकऱ्यांना या अवकाळीचा फटका बसला आहे. शासकीय मोजमापानुसार हे नुकसान जवळपास १२ कोटीच्या घरात असण्याची शक्यता आहे.

Story img Loader