नाशिक – सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नाशिककरांची जय्यत तयारी सुरू आहे. नाताळच्या सुट्यांच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात पर्यटक आणि भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रिसॉर्ट, हॉटेल, लॉज व्यावसायिक यांच्या व्यवसायात आधीच वाढ झाली असल्याने नववर्ष स्वागतासाठी त्यांच्याकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहर परिसरातील सर्व हॉटेलांमध्ये पर्यटकांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हुल्लडबाजांना आवर घालण्यासाठी पोलिसांची तयारी

नववर्ष स्वागताचा युवावर्गात अधिक उत्साह दिसून येत आहे. हाॅटेल तसेच जवळच्या पर्यटनस्थळी नववर्ष स्वागत करण्याच्या युवावर्गाच्या योजना आहेत. नाताळच्या सुट्यांमध्ये यंदा नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथे पर्यटक आणि भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. ही गर्दी दरवर्षीपेक्षा अधिक असल्याचे हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन संस्था संचालकांचे म्हणणे आहे. शहरासह जिल्ह्यातील रिसॉर्ट, व्हिला, लॉज आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये पर्यटक आणि भाविकांच्या गर्दीमुळे उत्साहाचे वातावरण आहे. या गर्दीमुळे नववर्ष स्वागतासाठी व्यावसायिकांकडून विद्युत रोषणाईसह नामांकित कलाकारांबरोबर संगीत मैफल, नृत्य मैफल, कुटूंबियांसाठी खास सवलत अशा विविध योजना आखल्या असून ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. नृत्याचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. यावर्षी नववर्ष स्वागतासाठी हाॅटेल, बियर बार पहाटे दोन ते तीन वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> सुंदर नारायण मंदिर दुरुस्तीचा संथपणा; पुरातत्व विभागाविरोधात स्थानिकांचा रोष

काही दिवसांपासून ऊन सावलीचा सुरू असणारा खेळ, ढगाळ वातावरण याचा फायदा पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी होत आहे. दिवाळीत विधानसभा निवडणुकांचा पर्यटन व्यवसायाला फटका बसला होता. ही कसर सध्या भरून निघत आहे. दिवाळीत बाहेर न पडलेले पर्यटक नाताळच्या सुटीत मोठ्या प्रमाणावर फिरण्यासाठी निघाले आहेत. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे काही हॉटेल व्यवसायिकांनी दर वाढवले असले तरी पर्यटकांचा उत्साह कायम आहे.

पर्यटक संख्येत वाढ

नाशिक शहराची इतर राज्यांशी संपर्क व्यवस्था वाढली आहे. यामुळे नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. काही जण धार्मिक पर्यटनासाठी तर, काही नैसर्गिक सानिध्यात निवांतपणा मिळावा म्हणून येतात. नाशिककडे पर्यटकांचा वाढलेला कल पाहता अनेक नामांकित व्यावसायिकांनी येथे जम बसविण्यास सुरूवात केली आहे. नाशिक शहर तसेच जिल्हा प्रशासनाने पर्यटकांचा ओढा कायम राहण्यासाठी काही उपाय योजने आवश्यक आहे. शहर सौंदर्यीकरणाकडे लक्ष देणे, फलकबाजीमुळे होणारे विद्रुपीकरण रोखणे, रिक्षाचालकांची अरेरावी थांबविणे, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. – दत्ता भालेराव (माजी अध्यक्ष, तान संघटना)