लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोमवारी मिरवणूक काढण्यात येणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठिकठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जुने नाशिक परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक राजवाडा-वाकडी बारव-चौक मंडई-दादासाहेब फाळके रोड- महात्मा फुले मार्केट-भद्रकाली मार्केट-मेनरोड- धुमाळ पॉइंट- रविवार कारंजा- रेडक्रॉस सिग्नल- नेहरू गार्डन-शालिमारमार्गे शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा मिरवणुकीचा मार्ग आहे. मिरवणूक मार्गावर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्गात राजवाडा, चौक मंडईमार्गे येणारी वाहने सारडा सर्कलमार्गे जातील. दिंडोरी नाका-मालेगाव स्टँड- रविवार कारंजा- सांगली बँक सिग्नलमार्गे शालिमार आणि सीबीएसकडे जा-ये करणाऱ्या बस तसेच इतर वाहने दिंडोरीनाका येथून पेठ फाटा सिग्नल- मखमलाबाद नाका-रामवाडी-अशोकस्तंभ-मेहर सिग्नल-सीबीएस सिग्नल-गडकरी चौकमार्गे सिडको, नाशिककरोडकडे जातील.
डॉ. आंबेडकर जयंती निमित्त पाथर्डी फाटा परिसरातूनही मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक इंदिरानगर भागातील वेगवेगळ्या मार्गाने जाणार आहे. त्यामुळे गरवारे पॉइंट ते पाथर्डी फाटा-कलानगर-फेम सिग्नल हा मार्ग, फेम सिग्नल ते कलानगर-पाथर्डी सर्कल, पाथर्डी फाटा ते गरवारे पॉइंट, पाथर्डी गाव ते पाथर्डी फाटा हे मार्ग अवजड वाहनांसाठी बंद राहतील. अंबड दिशेने नम्रता पेट्रोल पंप ते पाथर्डी फाटा हा मार्गही बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालक लोकमत कार्यालयाजवळून उड्डाणपूलमार्गे द्वारकाकडे जातील.
नाशिकरोड परिसरातही मिरवणुक काढण्यात येणार आहे. यामुळे सिन्नरफाटा ते उड्डाणपुलाखालून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे येणारा मार्ग, दत्त मंदिरकडून बिटको सिग्नलकडे येणारा मार्ग, रेल्वे ठाण्याकडून बिटकोकडे येणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.