अवजड वाहनांना विशिष्ट काळात शहरात प्रवेश बंद; तीन ठिकाणी सिग्नल उभारणी  वाहनतळांची अभ्यासांती अंमलबजावणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहरात विशिष्ट कालावधीत अवजड वाहनांना मनाई, प्रमुख रस्त्यांवरील आणि मोकळ्या जागेवरील एकूण ३३ वाहनतळांबाबत वाहतूक शाखेने अभ्यास करून तातडीने निर्णय द्यावा, विहितगाव, पपया नर्सरी आणि बीवायके महाविद्यालयालगतच्या टी. ए. कुलकर्णी चौकात सिग्नल व्यवस्था उभारणी, गोविंदनगर येथील कर्मयोगी चौकात सिग्नलऐवजी वाहतूक बेट आदी निर्णय सोमवारी महापालिकेच्या मोबिलीटी सेलच्या बैठकीत घेण्यात आले. वाहतूक कोंडीची समस्या दिवसागणिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. यावर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नाशिक फर्स्टचे अभय कुलकर्णी, शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग, एसटी महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात असल्याने कोंडीत भर पडते. स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेने यापूर्वी ३३ वाहनतळ प्रस्तावित केले आहेत. त्यातील सिटी सेंटर समोरील रस्त्यावर वाहनतळ सुरू केल्यानंतर त्यास वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतला. ना हरकत दाखला न घेताच तो वाहनतळ सुरू केला गेला. उपरोक्त ठिकाणी वाहने तिरकी की सरळ उभी करावी याचा विचार करावा लागणार आहे. या ठिकाणासह सर्वच्या सर्व ३३ वाहनतळांबाबत वाहतूक पोलिसांनी अभ्यास करून दोन दिवसात निर्णय घ्यावा, असे आयुक्तांनी सूचित केले. अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या स्मार्ट रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. मध्यवर्ती भागातील या कामामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. हे काम मुदतीपूर्वी पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे असे सांगण्यात आले.

प्रकल्प गोदाअंतर्गत रामवाडी पूल ते होळकर पूल दरम्यान काम करण्यात येईल. हे काम हाती घेण्यापूर्वी पोलीस यंत्रणेसह संबंधित विभागांनी नो पार्किंग, फेरीवाला क्षेत्र आदींबाबत अभ्यास करावा, असे बैठकीत ठरले.

शहरात दिवसरात्र अवजड वाहनांची वाहतूक होत असते. यामुळे मध्यवर्ती भागासह अनेक मार्गावर कोंडी निर्माण होते. शहरात विशिष्ट वेळेत अवजड वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यावर सर्वाचे एकमत झाले. ही वाहने ट्रक टर्मिनसमध्ये उभी करावीत. त्यांना शहरात प्रवेशासाठी विशिष्ट वेळ निश्चित केली जाईल. शहरात १२ अपघात प्रवणक्षेत्र आहेत. त्या ठिकाणी तात्पुरत्या उपायांसह कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी संस्थेची नेमणूक केली जाईल.

काही प्रमुख चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पाच चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्याचा विचार होता. त्यातील पपया नर्सरी (सातपूर), विहितगाव (देवळाली कॅम्प) आणि कॉलेज रोडवरील टी. ए. कुलकर्णी चौकात सिग्नल यंत्रणा उभारण्यास मान्यता देण्यात आली. गोविंदनगर येथील कर्मयोगी चौकात सिग्नलऐवजी वाहतूक बेट उभारण्यात येईल.

शहरात १८ वाहतूक बेटांचे प्रस्ताव मंजूर

शहरात १४५ ठिकाणी वाहतूक बेट, दुभाजक विकसित करणे, त्याची देखभाल दुरुस्ती आदींबाबत मागविलेल्या प्रस्तावांना २५ जणांचा प्रतिसाद मिळाला. त्यावर बैठकीत चर्चा होऊन १८ प्रस्तावांना अंतिम मान्यता देण्यात आली. एकाच ठिकाणचे वाहतूक बेट विकसित करण्यास दोन-तीन जणांनी स्वारस्य दाखविले आहे. त्यांची निवड करतांना स्वामित्व हक्क म्हणून काही शुल्क आकारावे काय, याचा विचार सुरू आहे.