धुळे – शहर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २०० रुपयाची लाच घेतांना रंगेहात पकडले. शहरातील धुळे तालुका पोलीस ठाण्याजवळ ही कारवाई झाली. याप्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.चाळीसगाव येथील रहिवासी मोटर सायकलने धुळे शहरात प्रवास करीत असतांना त्यांना तहसील चौक ते अॅग्लो उर्दू हायस्कूल दरम्यान अडवून वाहतूक पोलीस दिनेश सूर्यवंशी यांनी कागदपत्रांची चौकशी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी संबंधीत मोटारसायकलस्वाराने त्यांच्याकडे असलेला वाहन परवाना सूर्यवंशी यांना दाखविला. सर्व कागदपत्रे जवळ असताना आणि त्याची पडताळणी केल्यानंतरही सूर्यवंशी यांनी वेगवेगळी कारणे दाखवित पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास मोठ्या रकमेचा ऑनलाईन दंड आकारण्यात येईल, असा दम दिला. या पार्श्वभूमीवर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून संबंधीत वाहन धारकाने सूर्यवंशी याच्याशी संपर्क साधला. सूर्यवंशीने संबंधित वाहनधारकाकडे २०० रुपयांची मागणी केली. ही रक्कम स्विकारत असतांना सूर्यवंशी यास बुधवारी सकाळी रंगेहात पकडण्यात आले

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic police caught in the net while taking bribes amy