नाशिक: छटपूजा सणानिमित्त गोदा काठावर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रविवारी दुपारी तीन ते सोमवारी सकाळी नऊ या वेळेत रामकुंड आणि गंगाघाट परिसरातील रस्त्यांवरील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या वेळेत परिसरातील सहा रस्ते वाहतुकीस बंद राहणार असून वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे वाहतूक विभागाने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छटपूजेनिमित्त रामकुंड परिसरात भाविकांची दरवर्षी मोठी गर्दी होते. त्यामुळे पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांनी मोटार वाहन कायद्यान्वये वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार मालेगाव स्टॅण्डकडून रामकुंडाकडे येणारा रस्ता, सार्वजनिक वाचनालय, खांदवे सभागृह, सरदार चौक, दिल्ली दरवाजा आणि गणेशवाडी येथून रामकुंडाकडे येणारे, अशा एकूण सहा रस्त्यांवर रविवारी दुपारी तीन ते सोमवारी सकाळी नऊ या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.

हेही वाचा… मॅक्सचे संकेत अन डॉक्टरांची सतर्कता; बिबट्या जेरबंद करण्यात योगदान

या वेळेत उपरोक्त मार्गांवरून जाणारी वाहने गणेशवाडी, काट्या मारुती पोलीस चौकी, निमाणी बसस्थानक पंचवटी कारंजा या मार्गाने ये-जा करतील. वाहने उभी करण्यासाठी गोदा घाट आणि गाडगे महाराज पुलाखालील क्षेत्राचा वापर करता येईल,असे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic route changes in ramkund area nashik on sunday on the occasion of chhath puja dvr