नाशिक : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे जमा करण्यासाठी येवला तहसील कार्यालयात जाणाऱ्या महिलेचा कार्यालयाजवळ वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास हा अपघात झाला.
हेही वाचा…नाशिक : पुरोहित संघाचा रामतीर्थ समितीच्या गोदाघाटावरील कामास विरोध
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात महिलांची धावपळ होत आहे. कागदपत्रांच्या निमित्ताने अहमदननगर- मनमाड राज्य मार्गावरील येवला प्रशासकीय संकुलात जात असलेल्या उज्वला चौधरी (४५, रा. रेल्वे स्टेशन) यांना एका वाहनाची धडक बसली. डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.