नाशिक : शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात शुक्रवारी रात्री टेम्पो-मोटारीची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. टायर फुटल्याने भरधाव टेम्पो समोरून येणाऱ्या मोटारीवर धडकला. अपघातात मोटारीचा पूर्णत चक्काचूर झाला.

महामार्गावरील भगवान चक्रधर स्वामी मंदिराजवळ हा अपघात झाला. खत वाहतूक करणारा टेम्पो रात्री नाशिकहून ओझरच्या दिशेने निघाला होता. टेम्पोचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पो समोरून येणाऱ्या ब्रिझा मोटारीवर आदळला. त्यात मोटारीतील रहेमान तांबोळी (४८), अरबाज तांबोळी (२१, दोघे लेखानगर, सिडको) या मामा-भाच्यासह सज्जू पठाण (४०) व अक्षय जाधव (२४, दोघे इंदिरानगर) यांचा मृत्यू झाला. टेम्पो चालक बापू अहिरे आणि सहचालक सचिन म्हस्के हे गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पोची धडक इतकी जबरदस्त होती की, मोटारीचा पूर्णत चक्काचूर झाला. मोटारीतील व्यक्तींना बाहेर काढणे अशक्य बनले होते. अखेर अग्निशमन दलाने मोटारीचे पत्रे कापून त्यांना बाहेर काढले.

accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
nashik road jail
नाशिकरोड कारागृहातील जमिनीत दोन भ्रमणध्वनी, गुन्हा दाखल
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
nashik two school children died in accident
नाशिक : मालमोटारीखाली सापडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू, अल्पवयीन मुलाकडे दुचाकी देणे जिवावर बेतले
five year old boy electrocuted loksatta news
नाशिक : उघड्या रोहित्रामुळे अल्पवयीन मुलाचा मृत्यू
nashik newly married woman suicide loksatta
नाशिक : सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या
8 year old girl dies in accident near Ozar
नाशिक : ओझरजवळ अपघातात बालिकेचा मृत्यू

हेही वाचा…नाशिक : सटाणा तालुक्यातील एटीएम चोर ग्रामस्थांमुळे पोलिसांच्या ताब्यात

अपघातात मयत झालेले चौघेही नाशिकमधील रहिवासी आहेत. ते भाजीपाला व्यापारी असून कामानिमित्त बागलाणला गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाला. मयत अरबाज तांबोळी या युवकाचा महिनाभरापूर्वीच साखरपुडा झाला होता. काही दिवसांपूर्वी त्याने मोटार घेतली होती.

Story img Loader