जळगाव – मध्य रेल्वे प्रशासनातर्फे भुसावळ-मनमाड स्थानकांदरम्यान नवीन तिसरा मार्ग बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या मार्गावर इंटरलॉकिंगचे काम सुरू असल्याने १४ व १५ ऑगस्टदरम्यान पंधरा तास विशेष वाहतूक ब्लॉक राहणार असून, त्यामुळे ३४ रेल्वेगाड्या रद्द, तर सहा गाड्या काही अंतरापुरत्या (शॉर्ट टर्मिनेट) करण्यात आल्या असून, २० गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले आहेत.

पाचोरा ते मनमाडदरम्यान नवीन तिसर्‍या मार्गाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. त्याचाच एक भाग म्हणून भुसावळ विभाग १४ व १५ ऑगस्टदरम्यान पंधरा तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. तो सोमवारी (१४ ऑगस्ट) सकाळी अकरापासून असेल. या कालावधीत देवळाली- भुसावळ एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- साईनगर शिर्डी वंदे भारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नांदेड एक्स्प्रेस, इगतपुरी- भुसावळ मेमू, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, पुणे- जबलपूर एक्स्प्रेस, दादर- गोरखपूर एक्स्प्रेस, मुंबई- नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई- आदिलाबाद एक्स्प्रेस, पुणे- नागपूर एक्स्प्रेस, पनवेल- रिवा एक्स्प्रेस, पुणे- नागपूर एक्स्प्रेस, मुंबई- नांदेड एक्स्प्रेस, मुंबई- सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस, कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, त्याचप्रमाणे परतीच्या मार्गाच्या या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे- हावडा एक्स्प्रेस, हावडा- पुणे एक्स्प्रेस व नवी दिल्ली- बंगळुरू कर्नाटक एक्स्प्रेससह २० गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबईच्या मध्य रेल्वे मुख्यालयातील जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा – आईचा खून झाल्याचे कळताच निःशब्द झाला मुलगा! भाजपा नेत्या सना खानचा मारेकरी अमितला शुक्रवारपर्यंत कोठडी

मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजरवर परिणाम

गाड्या रद्द- डाउन मार्ग- देवळाली- भुसावळ एक्स्प्रेस (१४, १५ ऑगस्ट), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नांदेड एक्स्प्रेस (१४, १५ ऑगस्ट), इगतपुरी-भुसावळ मेमू (१४, १५ ऑगस्ट), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- जालना जनशताब्दी एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट), पुणे- जबलपूर एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट), मुंबई- नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस (१४, १५ ऑगस्ट), मुंबई- आदिलाबाद एक्स्प्रेस (१३, १४ ऑगस्ट), पुणे-नागपूर एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट), पनवेल-रिवा एक्स्प्रेस (१५ व २२ ऑगस्ट), पुणे-नागपूर एक्स्प्रेस (१५ ऑगस्ट), मुंबई- नांदेड राज्य राणी एक्स्प्रेस (१४, १५ ऑगस्ट), मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस (१४, १५ ऑगस्ट), कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट), एलटीटी- हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस (१५ ऑगस्ट), पुणे-भुसावळ एक्स्प्रेस (१४, १५ ऑगस्ट). अप मार्ग- भुसावळ- देवळाली एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट), भुसावळ-इगतपुरी मेमू (१४, १५ ऑगस्ट), हजूर साहिब नांदेड-मुंबई एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट), रिवा-पनवेल एक्स्प्रेस (१४, २१ ऑगस्ट), साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट), गोंदिया-कोल्हापूर एक्स्प्रेस (१४, १६ ऑगस्ट), गोरखपूर-दादर एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट), जालना-मुंबई एक्स्प्रेस (१४, १५ ऑगस्ट), आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस (१४, १५ ऑगस्ट), सिकंदराबाद-मुंबई एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट), नागपूर-पुणे एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट), हजूर साहिब नांदेड-मुंबई एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट), नागपूर-मुंबई एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट), हजूर साहिब नांदेड- एलटीटी एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट), भुसावळ- पुणे एक्स्प्रेस (१४, १५ ऑगस्ट). डाउन मार्ग बदललेल्या गाड्या- पुणे-हावडा एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट) लोणावळा, वसई राऊड-उधना आणि जळगावमार्गे वळवण्यात येईल. हजूर साहिब- नांदेड सचकंद एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट) पूर्णा-अकोला-भुसावळमार्गे आणि खांडवामार्गे वळवण्यात येईल.

हेही वाच – नागपूर : धक्कादायक! घरातच छापल्या बनावट नोटा, गेमिंग ॲपवर जुगार खेळण्याचे व्यसन

पुणे-जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट) लोणावळ, वसई राऊड-उधना आणि जळगावमार्गे वळवण्यात येईल. पुणे-दानापूर एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट) लोणावळा, वसई राऊड-उधना आणि जळगाव मार्गे वळवण्यात येईल. एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेस (१५ ऑगस्ट) वसई राऊड-उधना आणि जळगावमार्गे वळवली जाईल. पुणे-हावडा एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट) लोणावळा-पानवेमार्गे वळवली जाईल. दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट) पुणे-दौंडमार्गे वळवण्यात येईल. वास्को-द-गामा-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट) पुणे-लोणावळा-कल्याण-वसई रोड-भेस्तान-चलठाण-पाळधी आणि जळगावमार्गे वळवण्यात येईल. पुणे-बनारस एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट) लोणावळा-वसई रोड-भेस्तान आणि जळगावमार्गे वळवली जाईल. अप मार्ग बदलेल्या गाड्या- अमृतसर- हजूर साहिब नांदेड सचकंद एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट) भुसावळ कॉर्ड लाइन- अकोला आणि पूर्णामार्गे वळवण्यात येईल. निजामुद्दीन- म्हैसूर एक्स्प्रेस (१४ ऑगस्ट) इटारसी-भुसावळ-जळगाव-वसई रोड-कल्याण-लोणावळा आणि पुणेमार्गे वळवली जाईल.