नाशिक ग्रामीण पोलीस दलात महाराष्ट्र पोलीस अध्यादेश तसेच जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाच्या निर्णयानुसार मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठाण्यांसह नाशिक ग्रामीण नियंत्रण कक्षातही फेरबदल झाले आहेत. यामध्ये २० निरीक्षक आणि सहायक निरीक्षकांचा समावेश आहे.
जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळास प्रदान केलेल्या अधिकारानुसार नाशिक ग्रामीण पोलीस दलात अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ओझर विमानतळावरील सुरक्षा विभागातील निरीक्षक अशोक पवार यांना पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे, नियंत्रण कक्षातील निरीक्षक बिपीन शेवाळे यांची त्र्यंबकेश्वर, निरीक्षक बापू महाजन यांची निफाड, निरीक्षक राजेंद्र कुटे यांची सिन्नर, निरीक्षक श्याम निकम यांची सिन्नर औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.
हेही वाचा >>> नाशिक : खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाईची मागणी – ख्रिस्ती समाजाचा मूक मोर्चा
रमजानपुरा ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब थोरात यांची मनमाड, नियंत्रण कक्षातील निरीक्षक पांडुरंग पवार यांची येवला तालुका, नंदकुमार कदम यांची येवला शहर, नाशिक ग्रामीण अर्ज शाखेतील कैलास वाघ यांची चांदवड, नियंत्रण कक्षातील पंढरीनाथ ढोकणे यांची मालेगाव छावणी, जयराम छापरिया यांची किल्ला पोलीस ठाणे, शिवाजी बुधवंत यांची मालेगाव शहर, दौलत जाधव यांची आझादनगर, दोषसिध्दी शाखेचे यशवंत बाविस्कर यांची रमजानपुरा, चांदवड ठाण्याचे समीर बारावकर यांची देवळा, नियंत्रण कक्षातील सहायक निरीक्षक गणेश म्हस्के यांची हरसूल, दिंडोरीचे सहायक निरीक्षक चेतन लोखंडे यांची वावी, सुरगाण्याचे सहायक निरीक्षक नीलेश बोडके यांची वणी, देवळ्याचे सहायक निरीक्षक पुरूषोत्तम शिरसाठ यांची जायखेडा, आयशानगरचे सहायक निरीक्षक मनोज पवार यांची वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. नियंत्रण कक्षातील निरीक्षक दुर्गेश तिवारी यांची ओझर तर, राजू सुर्वे यांची इगतपुरी येथे बदली करण्यात आली आहे.
निरीक्षक संदिप रणदिवे, अनिल भवारी, दिंगबर भदाणे, सहायक निरीक्षक प्रल्हाद गिते, सागर कोते यांचीही बदली करण्यात येत असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे देण्यात येतील, अशी माहिती अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिली