नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अक्षता कलश पूजनावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, या कार्यक्रमासंबंधी परिपत्रक काढणारे प्रभारी कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी त्या घटनेचा या निर्णयाशी कुठलाही संबंध नसल्याचा दावा केला आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नियमावलीचे उल्लंघन करून प्रशासनाने विद्यापीठाच्या आवारात शनिवारी अयोध्येतून आलेल्या अक्षता कलश पूजनास परवानगी दिल्याने वाद उद्भवला होता. या कार्यक्रमाची माहिती शुक्रवारी रात्री उशिरा कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांनी परिपत्रकाद्वारे देत सर्व शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याची सूचना केली होती. या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीसह काही संघटनांनी आक्षेप घेत विरोध केल्यामुळे कुलगुरु प्रा. सोनवणे हे कार्यालयात असूनही पूजनास आले नव्हते. नंतर कार्यक्रमास उपस्थित राहणे ऐच्छिक होते, बंधनकारक नव्हते, असा बचाव विद्यापीठाने केला होता. कुलगुरुंनी विद्यापीठ कायद्याप्रमाणे कृती करणे अपेक्षित असताना त्यांना विद्यापीठाच्या उद्दीष्टांची जाण नसणे ही शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया शैक्षणिक वर्तुळातून उमटली होती. याविषयाकडे लोकसत्तानेही लक्ष वेधले होते. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील उचलबांगडीकडे पाहिले जात आहे.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
Canada has ended fast track visas for foreign students
कॅनडात शिक्षणासाठी जाणे कठीण, फास्ट ट्रॅक व्हिसावर घातली बंदी; याचा भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान

हेही वाचा… जळगाव जिल्ह्यात लाकूड तस्करी

मुक्त विद्यापीठात परीक्षा नियंत्रक असणाऱ्या पाटील यांच्याकडे वर्षभरापासून कुलसचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. १५ जानेवारी रोजी कुलसचिव पदासाठी मुलाखत होणार असताना कुलगुरुंनी उपरोक्त वादाची स्वत: कुठलीही जबाबदारी न घेता त्यांच्यावर एकतर्फी कारवाई केल्याची चर्चा आहे.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live: “अमोल कोल्हे, डरने की कोई बात नहीं”, जयंत पाटलांचा शिबिरातून सत्ताधाऱ्यांना टोला!

या संदर्भात कुलगुरू संजीव सोनवणे यांनी उपरोक्त घटनेशी या बदलाचा कुठलाही संबंध नसल्याचा दावा केला. काही दिवसात विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होत असून कुलसचिव पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पाटील यांनी पत्राद्वारे केली होती. पुढील काही दिवस ते ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नव्हते. त्यामुळे प्रभारी कुलसचिव पदाची जबाबदारी विद्यार्थी सेवा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.