नाशिक : कळवण तालुक्यातील रवळजी येथून देवळ्याच्या दिशेने मालमोटारीतून गाईंची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर वरवंडी येथे नागरिकांनी मालमोटार अडवून देवळा पोलिसांना कळविल्यानंतर मालमोटार पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास रवळजी येथून देवळ्याच्या दिशेने गाई भरुन मालमोटार निघाली होती. वरवंडी येथे ती नागरिकांनी अडवली. या घटनेची देवळा पोलिसांना माहिती मिळताच उपनिरीक्षक विक्रांत कचरे ,पोलीस नाईक विनय देवरे यांसह इतरांनी घटनास्थळी धाव घेत मालमोटार पोलीस ठाण्यात जमा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी संबंधित गाई या गो शाळेत नेत असल्याचे आणि रवळजी ग्रामपंचायतीने तशी परवानगी दिली असल्याचे पत्र यावेळी संबंधितांनी सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना दिले. याबाबत ग्रामपंचायतीला गाईंची वाहतूक करण्याची परवानगी देता येते का, यासंदर्भात चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहायक अधीक्षक पाटील यांनी यावेळी दिली. चौकशीत गाई कत्तलीसाठी नेत असल्याचे उघड झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transportation of cows from kalwan taluka vehicle at deola police station ysh