नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील बायपास रस्त्यावर खाजगी ट्रव्हल्स आणि आयशर यांच्यात भीषण धडक झाली आहे. या अपघातात तीण जण ठार तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. शहादा शहरातील बायपास रस्त्यावर असणाऱया नवीन बस स्थानका जवळ हा अपघात झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयशर मधील मजुर हे ऊसतोडणी साठी सांगलीकडे जात असल्याची प्राथमिक माहीती आहे. तर खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये देखील मजुर हे मजुरीसाठी गुजरात कडे जात होते. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीसाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travels and eicher accident nandurbar shahada three people death 17 people were injured tmb 01