संत तुकारामांनी दिलेला ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे..’ हा पर्यावरण संवर्धनाचा मूलमंत्र जपत शुक्रवारी जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने रोपांची लागवड करण्यास मंत्री, शासकीय अधिकारी व कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आदींचा उत्स्फूर्तपणे हातभार लागल्याचे पाहावयास मिळाले. ‘एकच लक्ष्य, दोन कोटी वृक्ष’ या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी सकाळी सहा वाजेपासून पर्यावरण प्रेमींचे जथे शहर परिसरातील टेकडय़ा, मोकळ्या आवारात, वन विभागाने निश्चित केलेल्या जागांवर धडकत होते. हा उत्साह दुपापर्यंत कायम होता. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वृक्षारोपण करताना छायाचित्र काढणे बंधनकारक होते. त्यामुळे संबंधितांचे लक्ष वृक्षारोपणाकडे कमी आणि छायाचित्र काढण्याकडे अधिक असल्याचे पहावयास मिळाले. वृक्षारोपणाचे सेल्फी काढणाऱ्यांना अध्र्या दिवसाची सुटी मिळणार असल्याने प्रत्येकाची त्या अनुषंगाने धडपड प्रकर्षांने जाणवली. या निमित्ताने लाखो वृक्षांचे रोपण झाले. त्यांचे संवर्धन होणे तितकेच गरजेचे आहे यादृष्टीने प्रशासन आणि सामाजिक संस्था यांनी विशेष नियोजन केल्याचा दावाही केला जात आहे.

sahyadri sankalp society work for growth and conservation of ratnagiri forests
सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरण संवर्धनासाठी ‘सह्याद्री संकल्प’चे मदतीचे आवाहन
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
article about sahyadri sankalp society information
सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचा ‘संकल्प’
construction houses mangroves, state government,
खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश
Chief Justice Dhananjay Chandrachud asserted that a three tier scheme would soon be in place for the disposal of cases
खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी लवकरच त्रिस्तरीय योजना; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन
uddhav thackeray latest marathi news,
“सरकार उलथून टाकण्यासाठी एकत्र या”, उद्धव ठाकरे यांचे सरपंचांना आवाहन
Pune potholes, Pune Municipal Commissioner,
पुणे : खबरदार… खड्डे न बुजविणाऱ्या मंडळांना आयुक्तांचा इशारा
Nashik, Congress, Nana Patole, Nana Patole Criticizes Maharashtra Government, Maharashtra government, Badlapur case, house arrest
भावना व्यक्त करणाऱ्यांना नजरकैद, नाना पटोले यांची महायुती सरकारवर टीका

या उपक्रमात लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आदींनी सहभागी होत पर्यावरण संवर्धनाची आस्था अधोरेखित केली. वृक्ष लागवड मोहिमेच्या जनजागृतीसाठी सकाळी शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्स मैदानावरून जनजागृती फेरी काढण्यात आली. त्यात शालेय विद्यार्थ्यांनी केलेली जंगली प्राण्यांची वेषभूषा सर्वाचे लक्ष वेधणारी ठरली. हरसुल रस्त्यावरील साप्ते गाव परिसरात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम झाला. पर्यावरणाचा बिघडणारा समतोल सावरण्यासाठी वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन आवश्यक असून वन महोत्सवानिमित्त आयोजित वृक्ष लागवड चळवळ लोकचळवळ होण्याची गरज असल्याचे महाजन यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात अभिनेता मंगेश देसाई, चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे, अक्षदा सावंत, संदीप गायकवाड आदींनी सहभाग नोंदविला. साप्ते येथे २० हेक्टर क्षेत्रावर ३२ हजार रोपांची लागवड करण्यात आली. त्यात बेहडा, कांचन, करंज, जांभूळ, चिंच, खैर आदी रोपांचा समावेश होता. या वृक्षारोपणात सिम्बॉयसिस, नवरचना माध्यमिक विद्यालय, विखे पाटील विद्यालय, सेंट लॉरेन्स हायस्कूल येथील विद्यार्थी सहभागी झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. हरित कुंभ समन्वय समितीच्यावतीने सहधर्मदाय आयुक्त कार्यालय परिसरात सहधर्मादाय आयुक्त प्रदीप घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. घुगे यांनी वृक्षांचे जतन व संगोपन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची असल्याची जाणीव करून दिली. चुंचाळे शिवारातील आनंदकानन टेकडीवर ‘ग्रीन रिव्हॅल्युशन’ संस्थेच्या वतीने २०० कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी, बचत गट, महिला मंडळे यांच्या सहकार्याने सहा हजार झाडे लावण्यात आली. दुपापर्यंत वृक्षारोपणाचे काम पूर्ण झाले होते. दुपारनंतर आलेल्या पर्यावरणप्रेमींना केवळ झाडांना पाणी टाकण्याचे काम करावे लागले. ही चळवळ पुढे जोमाने सुरू राहावी यासाठी नागरिकांना प्रत्येक शनिवारी, रविवारी श्रमदान करण्याचे आवाहन करण्यात आले. रोटरी क्लबच्या वतीने अंजनेरी परिसरात १००० आणि पिंपरी येथे १८०० रोपटी लावण्यात आली. चांदोरी येथील क. का. वाघ तंत्रनिकेतनने चांदोरी, पिंपळस व बाभळेश्वर येथील आवारात कडुनिंब, खैर, कांचन, करंज अशा विविध प्रकारच्या ३०० रोपांची लागवड केली. उपक्रमात आपलाही सहभाग असावा यासाठी चिमुकल्यांनी मैदान, घराजवळील मोकळ्या जागेत फुल झाडे लावत हा दिवस साजरा केला.

वृक्षारोपणासाठी आवश्यक असणारे पाणी हे पर्यावरणप्रेमींना घरून आणायला सांगण्यात आले होते. आयोजकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काहींनी पाणी घरून आणले तर अन्य लोकांसाठी

टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यानिमित्ताने काही ठिकाणी पर्यावरणपूरक कार्यक्रमांची माहिती देणारे फलकही लावण्यात आले.