लोकसत्ता वार्ताहर

नंदुरबार: आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी घेण्यात आलेले निर्णय मागे घ्यावेत, म्हणून मोर्चा काढण्याची धमकी दिली जात आहे. आपण मंत्री म्हणून विभागाच्या या कठोर निर्णयावर ठाम असून हा निर्णय कुठल्याही दबावात मागे घेतला जाणार नसल्याचे राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी स्पष्ट केले आहे.

Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Aba Bagul, Parvati Assembly Constituency,
‘बंडखोर’ आबांचे घरवापसीसाठी ‘आर्जव’
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता

५० टक्क्यांपेक्षा कमी निकाल लागणाऱ्या आश्रमशाळेच्या शिक्षकांची दोन पगारवाढ रद्द तर, ५१ ते ८० टक्के दरम्यान निकाल लागलेल्या आश्रमशाळेतील शिक्षकांची एक पगारवाढ रद्द करण्याचा शासन निर्णय आदिवासी विकास विभागाने जारी केला आहे. मुलगा पहिली ते दहावीपर्यंत आश्रमशाळेत असतांना त्याच्यावर शासन शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करीत असते. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षित असताना तसे होत नसल्यानेच कठोर पाऊल उचलले जात असल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले.

आणखी वाचा-केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मातोश्रींनाही सोनसाखळी चोरट्यांचा झटका, अडीच तोळ्याची सोन्याची पोत लंपास

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिक्षकांची चाचणी परीक्षा घेतली जाणार असून दर तीन महिन्यात आदिवासी विकास विभागाच्या शिक्षकांची चाचणी अनिवार्य असणार आहे. यानंतर गरज पडल्यास शिक्षकाला योग्य यंत्रणेमार्फत प्रशिक्षण देवून परिपूर्ण केले जाईल. काही नामांकित शाळा या विभागावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. नामांकित शाळा आम्हांला विद्यार्थ्याला घेत नसल्याचे सांगत असून दुसरीकडे पालकांना विभाग पैसे देत नसल्याचे खोटे सांगत आहेत. काही शाळा पैसै घेवून विद्यार्थ्यांना ठेवायचे नाही, असे सांगतात, असे डॉ. गावित यांनी नमूद केले.

Story img Loader