आदिवासी विकास विभागाच्या वतीने येथे शुक्रवारपासून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी आठ वाजता महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील मैदानावर स्पर्धा होणार आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार तसेच आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासह अनेक मान्यवर उदघाटनप्रसंगी उपस्थित राहणार असल्याची माहिती आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी दिली.

हेही वाचा >>> मार्चमध्ये नाशिकमध्ये ‘ऑटो ॲण्ड लॉजिस्टिक’ प्रदर्शन – चालकांसाठी विश्रांतीगृह, आरोग्य तपासणी, प्रशिक्षण केंद्राची उभारणी

amit shah in jalgaon during campaigning
भाजपचा अल्पसंख्यांकांना आरक्षण देण्यास विरोध; अमित शहा यांच्याकडून भूमिका जाहीर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
thane vidhan sabha campaign
निवडणूक प्रचारासाठी ठाण्यात ९४ रथांना परवानगी
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
akola vidhan sabha election 2024
प्रचारातून विकासाचे मुद्दे हद्दपार, जातीय राजकारण, बंडखोरी व मतविभाजनाचे गणितच चर्चेत; सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बगल
Jharkhand campaign trail
आश्वासनं देण्याची चढाओढ, झारखंडमझ्ये भाजपा-इंडिया आघाडीत वेगळीच स्पर्धा!
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान
How many hurdles in India way to host Olympics 2036
ऑलिम्पिक २०३६ आयोजनासाठी भारताच्या मार्गात किती अडथळे? सौदी, तुर्कीये, कतारचे आव्हान किती खडतर?

तीन दिवस चालणा-या या स्पर्धांचे बक्षिस वितरण १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. आदिवासी विकास विभागांमार्फत राज्यभरात नाशिक,अमरावती, नागपूर आणि ठाणे या चार विभागांतर्गत ४९९ शासकीय, ५४१ अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा यांसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सहाय्याने प्रकल्प, विभाग आणि राज्य अशा तीन स्तरांवर क्रीडास्पर्धा प्रत्येक शैक्षणिक वर्षात घेतल्या जातात. या स्पर्धांमध्ये कबड्डी,,खो खो, व्हाॅलीबाॅल, हॅण्डबॉल हे सांघिक खेळ तसेच ५००० मीटर चालणे, १०० मी, २०० मी, ४०० मी, ८०० मी, १५०० मी, ३००० मी धावणे, चार बाय १०० मीटर आणि चार बाय ४०० मीटर रिले, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, उंचउडी, लांबउडी यासारख्या प्रकारांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> नाशिक : औद्योगिक गुंतवणूक परिषदेत उद्योगांपुढील अडचणींवर चर्चा

नाशिक, नागपूर, अमरावती, ठाणे या चारही विभागातील ९११ मुले आणि ९१० मुली असे एकूण एक हजार ८२१ खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. चारही विभागांचे २०० संघ व्यवस्थापकही उपस्थित राहणार आहेत. स्पर्धांच्या आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.