त्र्यंबक, सुरगाणा बाजारपेठेत नाशिककरांची खरेदीसाठी गर्दी
पावसाने ओढ दिल्याचा विपरीत परिणाम भाजीपाला उत्पादनाच्या लागवडीवर होत आहे. परिणामी, भाजीपाल्याचे दर वाढत आहेत. या परिस्थितीत आदिवासीबहुल भागातून होणाऱ्या रानभाज्यांच्या आवकमुळे नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्र्यंबक, सुरगाणा येथील बाजारपेठेत या रानभाज्या विक्रीसाठी आदिवासी बांधव मोठय़ा संख्येने दाखल होत असून जंगल परिसरातील या भाज्या आदिवासींच्या अर्थार्जनाचा नवीन स्रोत ठरला आहे. नाशिककरांनी या भाज्या खरेदीसाठी गर्दी केली आहे.
जिल्ह्य़ातील दुर्गम, डोंगराळ, आदिवासी भागास निसर्गाने भरभरून दान दिले आहे. रानभाज्या हा त्यातील एक भाग. सध्या शेतीत कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याच्या नादात रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जात असल्याने आरोग्यविषयक तक्रारींमध्ये वाढ होत आहे. असे असताना आदिवासी भागात पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या हे वरदान ठरत आहे.
नानाविध रानभाज्यांनी सुरगाणासह त्र्यंबकेश्वर, मोखाडा, हरसूल, डांग परिसर फुलला आहे. पावसाळा सुरू झाल्याने आदिवासी बांधव नेहमीच्या भाज्यांना सोडचिठ्ठी देऊन जंगलाची वाट धरत असल्याचे चित्र पाहायला मिळते. पहिल्या पावसाच्या आगमनाबरोबर रानात कवळीची भाजी आली. कवळीच्या भाजीने सुरू झालेल्या रानभाज्यांचा मेवा एकापाठोपाठ एक बहरत आहे. त्यामध्ये कोवळे बांबू, करटुले, कडूकंद यासारख्या जवळपास ७० रानभाज्यांचा समावेश आहे. या रानभाज्या आता आदिवासी भागासह शहरातील बाजारातही मिळू लागल्या आहेत.
सध्या भात, नागली लावणीचा हंगाम सुरू आहे. शेतीसाठी खर्च होत असल्याने शेतमजुरांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. या स्थितीत कष्टकरी शेतमजुरांना रानभाज्यांचा आधार मिळतो. रानभाज्यांनी आदिवासी बांधवांना आर्थिक कमाईचा एक नवीन मार्ग सापडला आहे.
रानभाजी महोत्सवाची गरज
एरवी भाज्या १० ते १५ रुपये पावशेर या दराने मिळत असताना तुलनेत रानभाज्यांचा वाटा कमीत कमी २० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत मिळतो. नेहमीच्या भाज्यांपेक्षा वेगळा प्रकार आणि कुठल्याही रासायनिक खतांचा वापर नाही हे त्यांचे वैशिष्टय़े असते. यामुळे त्या चविष्ट असतात. रानभाज्यांना अद्याप शहरातून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. यामुळे शहरी भागात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्याची गरज आहे. जेणेकरून शहरवासीयांना त्यांची ओळख होईल आणि आदिवासी बांधवांना नवीन बाजारपेठ खुली होईल.
– हिरामण चौधरी, उंबरदे, सुरगाणा
बाजारात ७० रानभाज्या दाखल
नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन सारेच वैतागतात. अशा खवय्यांना आदिवासी भाग खुणावत आहे. केवळ पावसाळ्यात अधिक्याने उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांची चव नेहमीच्या भाज्यांपेक्षा वेगळी असते. जवळपास ७० रानभाज्या आदिवासी भागात उपलब्ध आहेत. त्यात कवळी, कोवळे बांबू, करटुले, कडूकंद, शेवळे, माठ, फांग, चाईचा मोहर, बोखरीचा मोहर, टेहरा, वाथरटे, रानकंद मोखा, वाघाटा, दिघवडी, भूईफोड, उळशाचा मोहर आदींचा अंतर्भाव आहे. त्र्यंबक, सुरगाणा येथील बाजारपेठेत तसेच सुरगाणा, करंजाळी, हरसूल, उमराळे या ठिकाणी रानभाज्या विक्रीसाठी येत आहेत. पावसाळ्यात पर्यटनस्थळांवर भ्रमंती करताना आदिवासीबहुल भागातील बाजारपेठेत या भाज्या उपलब्ध होतात.