शहरापासून जवळच असलेल्या शिंदे-पळसे येथे सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या अपघातात राज्य परिवहन महामंडळाच्या येथी आगाराचे (क्र. १) चालक भरत निंबाळकर यांचा जागीच मृत्यू झाला. निंबाळकर हे शिंदे-पळसे येथील रहिवासी असून सोमवारी पहाटे ओझरमिग बसवर चालक म्हणून ते जाणार होते. साडेपाचच्या सुमारास शिंदे-पळसे येथील गतिरोधक चौफुलीजवळ रस्त्याच्या बाजूला उभे राहून ते बसची वाट पाहात होते. त्या वेळी सिन्नरकडून वेगाने येणाऱ्या ट्रकची त्यांना धडक बसली. या धडकेमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी ट्रकचा पाठलाग केल्याने ट्रक जागीच सोडून चालक फरार झाला. निंबाळकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा