राज्यातील २२ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या जिल्ह्यातील सप्तश्रृंग गडावरील मंदिरातही वस्त्र संहिता लागु करण्याविषयी विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्यात चर्चा सुरू आहे. दुसरीकडे त्र्यंबकेश्वर मंदिरात यासंदर्भात अद्याप कुठलीच चर्चा नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नाशिक : वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेच्या बैठकीत वस्त्र संहितेविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीतील चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत राज्यातील २२ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागु करण्यात आली आहे. या अनुषंगाने साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या श्री सप्तश्रृंगी मंदिरात वस्त्रसंहिता लागु करण्या विषयी विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ यांच्यात बैठका सुरू आहेत. ग्रामस्थांची या संदर्भात सकारात्मक भूमिका आहे. याविषयी विश्वस्त ॲड. ललित निकम यांनी माहिती दिली. महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरात दर्शनासाठी वस्त्रसंहिता लागु करण्याविषयी निर्णय घेतला आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने सदर उपाययोजना स्वागतार्ह आहे. सप्तश्रृंगी निवासिनी देवी मंदिरात वस्त्र संहिता लागू करावी किंवा कसे, याबाबत अभ्यास करून अध्यक्ष, विश्वस्त मंडळ याबाबत सर्व समावेशक निर्णय घेतील, असे ॲड. निकम यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिराच्या विश्वस्त कार्यकारिणीचा कालावधी संपुष्टात येत आहे. वस्त्रसंहिता विषयक अद्याप कुठलाही निर्णय अथवा चर्चा झालेली नाही.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trustees and villagers discuss about implementing dress code in the saptashrungi temple zws