लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जळगाव: दीपावलीनिमित्त बाजारपेठांमध्ये चैतन्य असून, कपड्यांच्या बाजारात २५-३० कोटी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीतून १०-१५ कोटींची, तर मोटारी आणि पाच हजारावर दुचाकींची विक्री झाली आहे.

दिवाळीनिमित्त जळगावच्या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल झाली. यात मोटारींसह दुचाकी खरेदीचे प्रमाण गतवर्षाच्या तुलनेत यंदा अधिक होते. दिवाळीपूर्वी अनेकांनी वाहनांची नोंदणी केली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी मुहूर्तावर वाहनांचा ताबा घेतला. रविवारी सुटीच्या दिवशी लक्ष्मीपूजन आल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील वाहनांची दालने खुली होती.

आणखी वाचा-मध्य रेल्वेत तिकिटांचा काळाबाजार; सहा महिन्यात २६९ गुन्हे, ३१७ जणांना अटक

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अर्थात रविवारी विविध वाहनांच्या दालनांना खरेदीदारांनी यात्रेचे स्वरूप आले होते. महिनाभरापासून दुचाकींची नोंदणी करण्यात आली होती. ऐनवेळी येणाऱ्या ग्राहकांसाठी दुचाकी उपलब्ध करून ठेवल्या होत्या. यंदा दीपोत्सवात जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार दुचाकींची विक्री झाल्याचे पगारिया बजाज ऑटोचे सरव्यवस्थापक विवेक जोशी यांनी सांगितले. होंडा कंपनीच्या अॅक्टिवा, शाइन व डेजलर यांसह इतर ६०० पेक्षा अधिक दुचाकी, तर २० मोटारींची विक्री झाल्याचे राम होंडा दालनाचे सरव्यवस्थापक अमित तिवारी यांनी सांगितले. हिरोकार्पच्या स्प्लेंडर, स्कूटर या दुचाकींसह महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ, बोलेरो, पीकअप, झायलो, वेरिटो आणि थ्री व्हीलर अशा मोटारींसह ट्रॅक्टरना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सातपुडा ऑटोचे संचालक किरण बच्छाव यांनी सांगितले. टीव्हीएस, टाटा फियाट, शेवरोले, मारुती सुझुकी या कंपन्यांच्या मोटारींसह दुचाकींनाही मोठ्या प्रमाणात मागणी होती.

दीपावलीपूर्वी ग्राहकांकडून इलेक्ट्रॉनिक्स विविध वस्तूंची नोंदणी करण्यात आली होती. मायक्रोवेव्ह ओव्हन, संगणक संच, एलईडी दूरचित्रवाणी संच, लॅपटॉप, भ्रमणध्वनी संच, साउंड सिस्टिम, इअरफोन, सिंगल डोअर व डबल डोअर फ्रीज, वॉशिंग मशिन, होम थिएटर या वस्तूंना विशेष मागणी होती. ग्राहक १० हजारांपासून दोन-अडीच हजारांपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करताना दिसून आले. स्मार्ट एलईडी दूरचित्रवाणी संचांना सर्वाधिक मागणी होती. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारपेठेत १०-१५ कोटींचा व्यवसाय झाल्याचा अंदाज अनमोल इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक मयूर मोतीरामानी यांनी वर्तविला.

आणखी वाचा-पीएम विश्वकर्मा पोर्टलवर सरपंच नोंदणीत नाशिक आघाडीवर

लक्ष्मीपूजनासाठी झेंडूसह शेवंती, गुलाब यांसह अन्य फुलांना सर्वाधिक मागणी होती. यंदा वादळी पावसामुळे फुलांचे उत्पादन घटल्यामुळे आवकही कमी झाली. परिणामी दर वधारले होते. झेंडूच्या फुलांचा प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दर यंदा ८० ते १०० रुपयांपर्यंत होता. बाजार समितीत चार -पाच दिवसांत ४० ते ५० टन अर्थात रोज १० ते १२ मालमोटारींतून झेंडूच्या फुलांची आवक झाली होती. शेवंतींची फुले २०० ते २५० रुपये प्रतिकिलो होती. गुलाबाचे दर शेकड्याला २५० ते ३०० रुपयांपर्यंत होते.