जळगाव: दीपोत्सवाला सुरुवात झाली असून, शनिवारी धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत सोने-चांदी विक्रीतून शहरासह जिल्ह्यात वीस ते पंचवीस कोटींची उलाढाल झाली. सुवर्णपेढ्यांमध्ये चक्क पाय ठेवायला जागा नसल्याचे चित्र दिसून आले. सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली असली, तरीही खरेदीसाठी गुंतवणूकदारांसह ग्राहकांनी गर्दी केल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.
साडेतीन मुहूर्तावर विविध वस्तूंच्या खरेदीसह सोने-चांदी खरेदीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. धनत्रयोदशीला एक ग्रॅम सोने खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. यंदा शनिवारी व रविवार असे दोन दिवस धनत्रयोदशीचा मुहूर्त आहे. सकाळपासूनच सुवर्णपेढ्यांमध्ये धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत सोने-चांदी खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. आठवडाभरापासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू होते. आता दोन-तीन दिवसांपासून सोन्याच्या प्रतितोळ्याच्या दरा बाराशे, तर चांदीच्या प्रतिकिलो दरात तेवीसशे रुपयांची वाढ झाली असली, खरेदीसाठी उत्साह दिसून आला. शनिवारी सोन्याचा प्रतितोळा दर ५१ हजार ५०० रुपयांपर्यंत, तर चांदीचा प्रतिकिलो दर ५९ हजार रुपये होता. रविवारी सोने प्रतितोळा ५१ हजार ५०० रुपये आहे.
हेही वाचा : विश्लेषण : टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान धोकादायक संघ… पण जगज्जेतेपदाची संधी किती?
विजयादशमीनंतर धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत शहरासह जिल्ह्यात शनिवारी सोने-चांदीच्या विक्रीतून वीस ते पंचवीस कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. सुवर्णनगरी जळगावमध्ये सुमारे पंधरा कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. यंदा करोनाचे सावट कमी झाल्याने खरेदी अधिक वाढली असल्याचे चित्र दिसून आले. लहान व कमी वजनाच्या दागिन्यांना ग्राहकांकडून अधिक पसंती होती. सोने दागिने, शुद्ध सोन्याचे तुकडे, लड, शिक्के यांसह कलाकुसरीच्या दागिन्यांना सर्वाधिक मागणी असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.
हेही वाचा : मिलिंद नार्वेकरांचे अमित शहांशी चांगले संबंध ; गिरीश महाजन यांचा दावा
यंदा दोन दिवस धनत्रयोदशीचा मुहूर्त असून, या मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विजयदशमीला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. कलाकुसरीच्या दागिन्यांना सर्वाधिक पसंती होती. मुहूर्त साधत काहींनी विवाहासाठी दागिन्यांची खरेदी करीत आहेत. गुंतवणूकदारांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.- कपिल खोंडे (खोंडे ज्वेलर्स, जळगाव)
शनिवारी धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत राज्यातील ग्राहकांनी सुवर्णनगरीतून मोठ्या प्रमाणात खरेदी केली. सोने दागिने, सोन्याचे तुकडे, शिक्के यांसह फॅन्सी दागिन्यांना महिलांकडून पसंती दिली जात आहे. रविवारी सोने प्रतितोळे दर ५१ हजार ५०० रुपये आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा खरेदीदारांची अधिक गर्दी आहे.- मनोहर पाटील (सरव्यवस्थापक, बाफना ज्वेलर्स, जळगाव)