किरकोळ कारणावरून मंगळवारी चेतनानगरात एका युवकावर कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून मुख्य संशयित फरार आहे. लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> नाशिक : रस्त्यांच्या अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी जळगावात मनसेचे आंदोलन

वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील गुरू गोबिंद सिंग फाउंडेशनमध्ये संगणक शाखेत शिकणारा यश गरूड याच्यावर मंगळवारी दुपारी काही युवकांनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात यश जखमी झाला. भरवस्तीत घडलेल्या या प्रकाराने पोलिसांचा कोणताच वचक राहिला नसल्याची प्रतिक्रिया उमटली. इंदिरानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यावर पोलिसांनी दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयितांकडे चौकशी केली असता मकरसंक्रातीच्या दिवशी पतंगीवरून यशचे गल्लीतील काही मुलांसोबत भांडण झाल्याचे उघड झाले. या भांडणाचा वचपा काढण्यासाठी बुधवारी त्याच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली. या प्रकरणातील मुख्य संशयित फरार आहे. दरम्यान, या प्रकाराचा यशच्या पालकांनी धसका घेतला असून त्याला महाविद्यालयात सुरक्षितपणे ने-आण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. यशच्या पालकांवर तक्रार मागे घेण्यासाठी संशयितांकडून दबाव येत असल्याची चर्चा आहे.