घातक शस्त्र बाळगून समाजमाध्यमात चित्रफिती प्रसारित करून चमकोगिरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. संशयितांकडून तलवार आणि गुप्ती हस्तगत करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- धुळे : देवपूरातील लुटीचा गुन्हा उघडकीस; चोरटा ताब्यात

संशयित घातक शस्त्र बाळगून समाजमाध्यमात चित्रफिती प्रसारीत करीत होते. त्यांच्या चमकोगिरीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने भारतनगर भागातून संशयित फैजान नईम शेख (१९) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून स्टिलची धारदार तलवार हस्तगत करण्यात आली. संशयिताने ही तलवार मित्र सचिन इंगोले (२८, भारतनगर) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्याच्याकडेही घातक शस्त्र असल्याची माहिती दिली. पथकाने इंगोलेला अटक करून त्याच्याकडून गुप्ती हस्तगत केली. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात विना परवाना बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- नाशिक : विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करणारे दोन जण ताब्यात

गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, नाझीमखान पठाण, शरद सोनवणे, मुक्तार शेख, विशाल देवरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, काही वर्षांपूर्वी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरे करण्याचे प्रकार घडले होते. त्यावेळी संबंधितांविरोधात पोलिसांनी कारवाई केली होती. अलीकडच्या काळात वेगवेगळ्या चित्रफिती तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याचे प्रमाण वाढत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two arrested for posting video with weapon on social media in nashik dpj