धुळे : शहरातील बारा पत्थर चौकात कोयता गळ्याला लावून तरुणाच्या खिशातील भ्रमणध्वनी आणि रोख रक्कम हिसकावून नेणाऱ्या दोन जणांना ताबडतोब अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. त्यांच्याकडून एक लाखोंचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरुवारी रात्री बारा पत्थर चौकातील गॅरेजजवळ दीपक अहिरे (३३, बिलाडी, धुळे) यांच्या खिशातील १० हजाराची रोकड,चांदीचे ब्रेसलेट, भ्रमणध्वनी असा ऐवज दोघांनी हिसकावून नेला. धुळे-सुरत महामार्गावरील कुसूंबा गावच्या अलीकडे  हॉटेल कलकत्ता पंजाबजवळ सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दोघा संशयितांना पकडले. अकबरअली केसरअली शाह (३०,रा.शब्बीर नगर, चाळीसगाव रोड, धुळे) आणि नईम इसाक पिंजारी (३५, जामचा मळा, धुळे) अशी त्यांची नावे आहेत. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. याशिवाय धुळे तालुका हद्यीतील अन्य गावातही घरफोडी केल्याची कबुली दिली. दोघांच्या अंगझडतीत सात हजार ८३० रुपये, १५ हजाराची माळ, सहा हजाराची रिंग, १५ हजाराचे तीन भ्रमणध्वनी, ५० हजाराची मोटार सायकल असा सुमारे एक लाख, एक हजार, २३० रुपयांचा मुद्देमाल सापडला. दोघांनाही पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती अधीक्षक बारकुंड यांनी दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two arrested in dhule to the local crime investigation department ysh