जळगाव: दुचाकीवरून आपल्या गावी घराकडे परतणार्या दोन तरुणांचा समोरून येणार्‍या भरधाव मोटारीची धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना रामदेववाडीनजीक हनुमान मंदिराजवळ घडली. रफिक हुसेन मेवाती (२३) व अरबाज जहाँगीर मेवाती (२०, दोन्ही रा. राणीचे बांबरूड, ता. पाचोरा) अशी अपघातात मत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

रफिक हा रोज भावंडांसोबत जळगावात पेरू विक्री करीत असे. रफिक मित्र अरबाज याच्यासोबत राणीचे बांबरूड येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. शिरसोलीच्या पुढे असलेल्या हनुमान मंदिराजवळून दुचाकीने जात असताना पाचोर्‍याकडून जळगावकडे भरधाव येणार्‍या मोटारीची धडक बसली. त्यात दुचाकीवरील दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा: सीमावर्ती समस्यांवर युध्दपातळीवर तोडग्याची तयारी; काही गावांच्या गुजरातला जोडण्याच्या मागणीनंतर प्रशासन सतर्क

अरबाज हा हातमजुरी करीत होता. पंधरा दिवसांपूर्वी त्याने मालमोटार घेतली होती. त्यानिमित्त तो औरंगाबाद येथे गेला होता. काम आटोपल्यानंतर तो जळगावात आला आणि येथून अरबाज व रफिक हे दोन्ही मित्र घरी जाण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यातच त्यांच्यावर काळाने झडप घातली. रफिक याच्या मागे आई, वडील, तीन भाऊ आणि बहिणी असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नाची बोलणी सुरू होती. अरबाज याच्यामागे आई, वडील, तीन भाऊ असा परिवार आहे.

Story img Loader