नाशिक – शहरातील स्थानिक गुन्हे शाखा एकच्या पथकाने मेफिड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या टिप्पर गॅंगच्या सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई येथील साईनाका पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात नाशिकजवळील शिंदे गावात अमली पदार्थ तयार करण्याच्या कारखान्यावर छापा टाकला होता. यानंतर नाशिकच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सोलापूर, संभाजीनगर, पालघर, पुणेसह अनेक जिल्ह्यात छापे टाकत एमडीसह इतर असा कोट्यवधींचा माल हस्तगत केल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. त्यानंतर शहरात अमली पदार्थविषयक घडामोडी थांबल्या असे वाटत असताना नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या विभाग एकला पाथर्डी शिवारात संशयित निखील पगारे हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने या ठिकाणी छापा टाकत पगारे याला अटक केली. यावेळी कुणाल घोडेराज या त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख रुपयांची २० ग्रॅम एमडी पावडर हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नाशिकमध्ये अजूनही एमडी या अमली पदार्थाची विक्री आणि पुरवठा होत असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा >>>नाशिक: सिन्नर तालुक्यात बिबट्या जेरबंद

दरम्यान, पोलिसांकडून निखील आणि कुणाल हे दोघे एमडी कोणाला विक्री करणार होते, त्यांच्याकडे एमडी कुठून आले, त्यांचे आणखी कोण साथीदार आहेत, याचा तपास करण्यात येत आहे. इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात दोघांना देण्यात आले आहे. शहर पोलिसांकडून शहर अमली पदार्थमुक्त करण्यासाठी कारवाई सुरू राहणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, कोणीही अमली पदार्थाचे सेवन करू नये असे आवाहन शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.

निखील पगारे सराईत गुन्हेगार

निखील पगारे हा पोलिसांच्या नोंदीतील सराईत गुन्हेगार असून टिप्पर गॅंगचा सदस्य आहे. त्याने त्याचा साथीदार मोहम्मद सय्यद याच्याकडे त्याच्या ताब्यातील बंदूक विक्रीसाठी दिली होती. त्यामुळे मोहम्मदचा शोध घेण्यात येत असून दोघांविरूध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात याआधीच गुन्हा दाखल आहे. निखील आणि कुणाल यांना एमडी पुरवणारा आनंद जायभावे असल्याचा संशय असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हे पदार्थ शहरात येतात कुठून, याचाही तपास करण्यात येत आहे.