शिर्डीहून दर्शन घेऊन त्र्यंबकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर, दोन जण जखमी झाले. हा अपघात सिन्नर तालुक्यातील देवपूर फाट्याजवळ झाला. जखमींना नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>जळगाव: बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू; एरंडोल तालुक्यातील घटना

मुंबई येथील काही साईभक्त शिर्डी येथे दर्शनासाठी खासगी वाहनाने गेले होते. बुधवारी सकाळी दर्शन झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी ते निघाले. वाहनात चालकासह नऊ जण होते. सिन्नर तालुक्यातील देवपूर फाटा परिसरात त्यांचे वाहन आले असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. वाहन मुख्य मार्गावरून दूर फेकले गेले. या अपघातात मीरा भाईंदर येथील इंद्रदेव मोर्या (२८) आणि सत्येंद्र यादव यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्रिवेंद्र त्रिपाठी आणि रोहित मोर्या हे गंभीर जखमी आहेत. वावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.

हेही वाचा >>>नाशिक: भटक्या श्वानांच्या संख्या नियंत्रणावर शंका; शहरात ४५ हजार मोकाट श्वान असल्याचा अंदाज

सिन्नर- शिर्डी महामार्ग भाविकांनी सतत गजबजलेला असतो. पायी जाणारे तसेच वाहनांनी जाणाऱ्या साई भक्तांची संख्या लक्षणीय असते. या रस्त्यावर ठिकठिकाणी दुरूस्तीसह अन्य कामे सुरू असल्याने वाहतुकीला खोळंबा होतो. हा वेळ भरून काढण्यासाठी चालक वेग वाढवितात आणि अपघाताला निमंत्रण मिळते. पायी चालणाऱ्यांसाठी प्रशासनाने दिशादर्शक फलकासह अन्य काही व्यवस्था करणे आवश्यक आहे.

Story img Loader