लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव: तालुक्यातील चिंचोली गावानजीक गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे उभी असलेली मालमोटार उलटून त्याखाली दबून आडोशाला उभ्या असलेल्या अभियंत्यासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर आहे.

चिंचोली गावानजीक नवीन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाचा ठेका पुणे येथील न्याती कन्स्ट्रक्शनला देण्यात आला आहे. बांधकामासाठी बिहारमधील काही मजूर आले आहेत. गुरुवारी दुपारी वादळी वारा वाहू लागल्याने वादळापासून जीव वाचविण्यासाठी मजुरांनी पत्र्याच्या शेडचा आसरा घेतला. वादळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने पत्र्याचे शेड उडाले. त्यामुळे शेडमधील मजूर तेथे उभ्या असलेल्या वाहनाच्या आडोशाला गेले.

हेही वाचा… क्रिप्टोत नफ्याचे आमिष दाखवून तरुणाला १५ लाखांचा गंडा

मात्र, वादळी वाऱ्याने वाहनही उलटले. त्याखाली भोला पटेल (रा. सानिकावा, बिहार) आणि चंद्रकांत वाभळे (५२, रा. चाळीसगाव, सध्या पुणे) हे दाबले गेले. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अफरोज आलम (२३, रा. कुंडाळे, बिहार) हा जखमी झाला. जखमीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. क्रेनद्वारे वाहन बाजूला करुन दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा… जळगावात चोराकडून ३१ सायकली जप्त

मृत भोला हा कंत्राटी पद्धतीने कामाला होता. गावातील काही मित्रांसोबत तो कामासाठी आला होता. त्याच्यामागे आई, वडील, भाऊ, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. चंद्रकांत वाभळे हे अभियंता म्हणून न्याती कंपनीत नोकरीला होते. १५ दिवसांपासून ते वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या कामासाठी आले होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two died including an engineer after being crushed under a cargo truck which overturned due to the stormy wind in jalgaon dvr
Show comments