लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाशिक: जिल्ह्यात परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून द्राक्ष बागायतदारांची फसवणूक होणे नवीन नाही. दरवर्षी अशा तक्रारी येत असताना आता जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडूनही द्राक्ष उत्पादकांची फसवणू होऊ लागली आहे. दिंडोरी आणि जायखेडा पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या तक्रारी दाखल झाल्या असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील किरण जाधव या शेतकऱ्याकडून पिंपळगाव बसवंत येथील अविनाश मोरे या व्यापाऱ्याने द्राक्षे खरेदी केली. प्रतिकिलो ४९ रुपये दराने व्यवहार ठरला. मालाचे पैसे हे बाग संपल्यावर पुढील दोन दिवसात देतो, असे सांगून मोरे याने ८६९० किलो द्राक्षे खरेदी केली. साधारणत: चार लाख, २५ हजार, ८१० रुपये किंमतीचा माल खरेदी केला. व्यवहार झाल्यानंतरही जाधव यांना मोरेकडून ठरलेले पैसे देण्यात आलेले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर जाधव यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा… माहिती आयोगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न, महिलेविरुध्द गुन्हा
दुसरी घटना बागलाण तालुक्यात घडली. तालुक्यातील वाघळे येथील पुंडलिक वाघ या शेतकऱ्याकडून दिलीप वाघ या व्यापाऱ्याने ७१ रुपये किलो दराने तीन टन, ८२ किलो द्राक्षे खरेदी केले. या व्यवहाराची रक्कम दोन लाख, १८ हजार रुपये झाली. दिलीप वाघने संबंधित रकमेचा एचडीएफएसी बँकेचा धनादेश शेतकऱ्यास दिला. पुंडलिक वाघ यांनी धनादेश वटविण्यासाठी बँकेत दिला असता तो वटला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पुंडलिक वाघ यांनी जायखेडा पोलिसांकडे तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.