लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील चुंचाळे भागात घरफोड्या करणाऱ्या संशयिताला मंचर येथून ताब्यात घेत पोलिसांनी सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. अजून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Two arrested for stealing a vehicle in Pimpri
पिंपरी: वाहन चोरी करणारे दोघे अटकेत; आठ दुचाकी जप्त
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Bavdhan , pistols, cartridges , koyta ,
पिंपरी : बावधनमध्ये तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते जप्त
Nagpur murder news
गृहमंत्र्यांच्या शहरात हत्याकांडाची मालिका! चौघांनी मित्राचा खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकला…
In four cases of burglary in different parts of Nashik city more than 30 lakhs lost
नाशिक शहरात घरफोडीचे सत्र, ३० लाखहून अधिकचा ऐवज लंपास
Nashik Rural Local Crime Branch arrested burglary and loot gang
हरसूल, त्र्यंबकेश्वर भागात घरफोडी करणारी टोळी ताब्यात
accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
nashik road jail
नाशिकरोड कारागृहातील जमिनीत दोन भ्रमणध्वनी, गुन्हा दाखल

अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील चुंचाळे पोलीस चौक हद्दीत घरफोडी करणाऱ्या संशयिताची माहिती पोलिसांना मिळाल्यावर माहितीची तांत्रिक आणि मानवी संसाधनाच्या आधारे तपासणी करुन प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी पथक तयार केले. उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास केला असता संशयित मंचर येथे असल्याची माहिती मिळाली.

आणखी वाचा-हिंदूप्रमाणेच इतरांनीही कायद्याचे पालन करावे – नितेश राणे यांचे आवाहन

पथकाने मंचर गाठत संशयित भारत खरात (३५, रा.मंचर) याला ताब्यात घेतले. दुसरा संशयित फरार आहे. भारतने साथीदारासह अंबड परिसरात सात ठिकाणी बंद घर, कंपन्यामधून पाच लाख २२ हजार रुपये किंमतीचे सोने, चांदी आणि इतर धातुंची चोरी केल्याची कबुली दिली. त्याचा साथीदार सोनु कांबळे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य संशयित फरार आहे.

Story img Loader