नाशिक: पेठ तालुक्यात सोमवारी सायंकाळी खासगी प्रवासी वाहन दरीत कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. २५ प्रवासी जखमी झाले. या प्रकरणी पेठ तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पेठ तालुक्यात सोमवारी सायंकाळी मजुरांनी भरलेली जीप घाटातून जात असताना हा अपघात झाला. दिवाळीनिमित्त पेठ येथील बाजारात खरेदीसाठी आलेले मजूर कृष्णा गाडर वाहनात बसलेले होते. पळशी, चिखलीकडे वाहन जात असतांना वळणावर वाहनाचे ब्रेक नादुरुस्त झाले. त्यामुळे दरीत कोसळले. या अपघातात धनराज पाडवी (१५) आणि रामदास गायकवाड (५५, रा.चिखली) यांचा मृत्यू झाला. जखमींना पेठच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले. जीपमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्याने हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा >>> जळगाव: लाच प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक
अपघातात चालक पुंडलिक गाडर (३२), देवीदास गाडर (१५), मुरलीधर दोडके (५२), लक्ष्मण पाडवी (३५), गोकुळ जांजर (७), लक्ष्मण तुंबडे (६०), वसंत चौधरी (४५), रेखा करवंदे (३५), मोहन जांजर (३३), वामन गायकवाड (३५), मयूर भवर (१०), लक्ष्मीबाई पवार (६०), जिजाबाई गाडर (६५), साळीबाई इजल (६७), मनी मानभाव (७०), वृषाली तुंडे (१३), अंजनी भुसारे (४८), कमळीबाई ठेपणे (५०), जयराम गाडर (३२), येवाजी भवर, हरी ठेपणे (६५) सर्व रा. चिखली यांच्यासह पवना ब्राह्मणे (१०) आणि कुसुम ब्रााम्हणे (३५, रा. फणसपाडा), शिवराम दरोडे (४०), भुवन भोये (६५, रा. उंबरपाडा) हे जखमी आहेत. पेठ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.