नाशिक – नाशिकरोड परिसरात दोन अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून त्यात परिचारिकेचा समावेश आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या दसक येथील रुग्णालयात काम करणाऱ्या प्रिया पवार-जाधव (३४, रा. पाथर्डी गाव) या परिचारिका कामासाठी पाथर्डी गावातून रिक्षाने विहितगाव येथे जात असताना रिक्षा वडनेर गावाजवळ उलटली. यामुळे प्रिया रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या. त्यांच्या डोक्याला मार लागला.

हेही वाचा >>> गंगापूर रोड भागात बिबट्याचा वावर, वन विभागाकडून सावधगिरीच्या सूचना

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Union Health Minister confirms sudden deaths in India are not caused by COVID-19 vaccines, addressing public concerns about vaccine safety.
Deaths Due To Corona Vaccine : “करोना लशीमुळे झाले नाहीत लोकांचे मृत्यू”, मोदी सरकारने संसदेत सांगितली अचानक मृत्यूंमागील कारणे
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर
Mysterious flu like Disease X
आणखी एका महासाथीचा धोका? आतापर्यंत ७९ जणांचा मृत्यू; काय आहे ‘Disease X’?

चालक संजय पगारे हेही जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी प्रिया यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सासू, सासरे असा परिवार आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा अपघात बिटको चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर झाला. गुलाम मुस्तफा शहा दुचाकीने उड्डाणपुलावरुन जात असताना मालवाहतूक वाहनाची धडक दुचाकीला बसली. ही धडक जबरदस्त असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ उड्डाणपुलावरील वाहतूक विस्कळीत झाली. नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Story img Loader