नाशिक : नाशिकरोडजवळील विहितगाव परिसरात मध्यरात्री समाजकंटकांनी इमारतींच्या वाहनतळात उभ्या असलेल्या वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड करीत धुमाकूळ घातला. ज्वलनशील पदार्थ टाकून दुचाकी पेटविल्या. अन्य एका इमारतीतील वाहनांची कोयत्याने तोडफोड करण्यात आली. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शहर हादरले असून नागरिक भयभीत झाले आहेत. टवाळखोरांची गय केली जाणार नसल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी सिडको परिसरात मद्यपी समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड केली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता विहितगाव येथे झाली. विहितगावमधील रामकृष्ण हरी प्राइड इमारतीच्या वाहनतळात हा प्रकार घडला. दोन संशयितांनी केलेल्या जाळपोळीचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पहाटे दोन वाजता कोयता घेऊन संशयित वाहनतळात आले. ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांनी वाहनतळातील दुचाकी पेटवून दिल्या. नंतर रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांवर कोयत्याने हल्ला केला. परिसरात दहशत पसरविली. या घटनेत सुमारे अनेक वाहनांचे नुकसान झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. या घटनेची माहिती समजताच सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकारी पथकासह दाखल झाले.

Fact Check Of Little Girl Trapped Under Rubble
ढिगाऱ्याखाली अडकली चिमुकली, मदतीची करतेय याचना; हृदय पिळवटून टाकणाऱ्या VIRAL VIDEO मुळे उडाली खळबळ, पण सत्य काय? वाचा
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
fire incidents at 14 places in pune city on lakshmi laxmi pooja
पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात ३१ ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या
Massive pollution due to firecrackers during Diwali
फटाक्यांच्या विषारी धुरामुळे श्वास कोंडला!
man light a small rocket using Alexa
“अलेक्सा रॉकेट लाँच कर…” मालकाने सूचना देताच फटाके फोडण्यासाठी Alexa तयार, पाहा दिवाळीचा हा खास VIRAL VIDEO
awareness campaign by fire brigade during diwali
दिवाळीत अग्निशमन दलाकडून जनजागृती मोहिम; सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

हेही वाचा… मारहाणीमुळे जखमी महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; धुळ्यातील ड्रीम्स हर्बल कंपनीच्या मालकास अटक

Video : नाशिकमध्ये समाजकंटकांचा धुमाकूळ; अनेक वाहनांची जाळपोळ, तोडफोड

यापूर्वीही शहरात वाहनांची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यात काही घटनांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा सहभाग उघड झाल्याचा इतिहास आहे. आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी तसेच पोलिसांना धडा शिकविण्यासाठी वाहनांची जाळपोळ करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे.

हेही वाचा… निश्चितीनंतरही गाईच्या दूध दरात घसरण; शेतकरी संघटनेचा आक्षेप

गय केली जाणार नाही

नाशिकमध्ये गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याची घटना घडली आहे. नाशिकरोडच्या विहितगाव परिसरात युवकांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही युवकांनी कोयता मिरवित गाड्यांची तोडफोड केली आहे. या समाज कंटकांवर कडक कारवाई करण्यात येईल. सीसीटिव्हीच्या आधारे संशयितांची ओळख पटली असून टवाळखोरांची गय केली जाणार नाही. संशयितांचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत. – दादा भुसे, (पालकमंत्री नाशिक)