नाशिक : सातपूर-अंबड लिंक रस्त्यावरील चुंचाळे शिवारात रविवारी दुपारी दोन अल्पवयीन मुले शेततळ्यात पाय घसरून बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. संबंधितांचा शोध घेण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने शेततळे फोडण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोध मोहीम सुरू होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे ही वाचा…नाशिक : पिसाळलेल्या बैलावर नियंत्रणासाठी रात्रीस खेळ चाले…

या घटनाक्रमाची माहिती माजी नगरसेवक सचिन भोर यांनी दिली. भोर यांच्या मळ्यात ही दुर्घटना घडली. या ठिकाणी शेततळे आहे. विराजनगरमधील तीन अल्पवयीन मुले या ठिकाणी आली होती. त्यातील दोन जण पाय घसरून शेततळ्यात पडली. या घटनेमुळे घाबरलेल्या अन्य मुलाने घरी धाव घेऊन या घटनेची माहिती दिली. कुटुंबियांसह आसपासच्या नागरिकांनी धाव घेतली. माजी नगरसेवक सचिन भोर हे देखील दाखल झाले. शेततळ्याबाहेर मुलांचे कपडे पडलेले होते, मुलांना वाचविण्यासाठी त्यांनी तातडीने जेसीबी बोलावून शेततळे फोडले. सायंकाळपर्यंत मुलांचा शोध लागला नव्हता. अग्निशमनच्या जवानांकडून शोध मोहीम सुरू असल्याचे भोर यांनी सांगितले. शेततळ्यात बुडालेल्या मुलांमध्ये आठ आणि १२ वर्षाच्या मुलाचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two minors are drowned after slipping into farm field in chunchale shiwar on sunday sud 02