लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : जिल्ह्यातील नाशिक-दिंडोरी मार्गावर रविवारी सायंकाळी राज्य परिवहनची बस आणि मोटार यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या अपघातात मोटारीतील दोन जणांचा मृत्यू झाला. तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

आणखी वाचा-नाशिक : युवक हत्याप्रकरणातील दुसऱ्या संशयितास अटक

नाशिकहून कळवण आगाराची बस सायंकाळी मार्गस्थ झाली. बसमध्ये २६ प्रवासी होते. बस दिंडोरीजवळील अक्राळे फाटा परिसरात आली असता मोटार आणि बस यांच्यात धडक झाली. मोटार सीएनजीवर असल्याने पेट घेतला. त्यामुळे बसही पेटली. बसमधील प्रवासी त्वरेने खिडकीतून, दरवाजातून बाहेर पडले. मोटारीतील दोन जणांचा होरपळल्याने मृत्यू झाला असल्याची माहिती राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी दिली. तीन जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयतांची ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two people died by burn in fire in an accident in nashik district mrj